सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रराजकारण

युतीच्या नगरपरिषद प्रचाराची दमदार सुरुवात; शहरभर धार्मिक स्थळांना भेटी

युतीच्या नगरपरिषद प्रचाराची दमदार सुरुवात; शहरभर धार्मिक स्थळांना भेटी

उदगीर : येऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाई या युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज भुईकोट किल्ल्यातून औपचारिक शुभारंभ झाला. शहरातील आराध्य दैवत श्री उदयगिरी बाबांच्या महाआरतीने प्रारंभ झालेला हा प्रचार दौरा दिवसभर उत्साहात पार पडला.

यावेळी उदगीर-जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी उदगीरच्या झालेल्या विकासाचा उल्लेख करत, “स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार करण्यासाठी मागील सहा वर्षांत मोठ्या प्रमाणात काम झाले. जनतेने दाखविलेला विश्वास कायम ठेवत युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील,” असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी पुढे असेही सांगितले की, “शहराच्या प्रगतीला वेग देण्यासाठी एकजुटीची ही वेळ असून युतीचे उमेदवार शहराच्या विकासाची जबाबदारी पार पाडतील.”

प्रचाराच्या शुभारंभानिमित्त युतीचे पदाधिकारी, समर्थक आणि उमेदवारांनी शहरातील विविध धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देत अभिवादन केले. खाजा बादशाहा दर्गा येथे चादर चढविण्यात आली, त्यानंतर श्री गुरु हावगीस्वाती मठ, श्री शंकरलिंग महाराज मठ आणि विश्‍वशांती बुद्ध विहार येथे दर्शन घेण्यात आले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, डॉ. झाकीर हुसेन, बसवेश्वर महाराज आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाला माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, माजी नगरसेवक सचिन हुडे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. स्वाती हुडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात आज दिवसभर राजकीय वातावरण उत्साहपूर्ण राहिले असून पुढील काही दिवस प्रचार अधिक गतीशील होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button