मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी आयटीआय भोकर येथे शिबिराचे आयोजन.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी आयटीआय भोकर येथे शिबिराचे आयोजन.
************
भोकर(तालुका प्रतिनिधी) हसूल पंधरवडा उपक्रमांतर्गत 2 ऑगस्ट 2024 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकर येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिर आयोजित करण्यात आले.
बेरोजगार युवकांना शासनाच्या या योजनेचा ग्रामीण पातळीवर लाभ व्हावा या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी भोकर प्रवीण मेंगशेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात भोकर तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील एकूण 138 युवक युवती यांनी प्रशिक्षणात भाग घेऊन शासनाच्या योजनेसंबंधी माहिती घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले. योजनेची सविस्तर माहिती व पुढील कार्यवाही बाबत शिल्प निदेशक या शिबिरात प्रशिक्षण संस्थेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय नियम शासकीय व खाजगी कंपन्यांमध्ये निवड व्हावी यासाठी आपली कौशल्य व गुणवत्ता विकसित करावी तसेच केवळ नोकरीची अपेक्षा न करता व्यवसायिक प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून स्वबळावर व्यवसाय करावेत असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे वेळेत दिली जातील अशी ग्वाही दिली. यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे, प्रभारी नायब तहसीलदार मुसा सरवर, आयटीआय चे निदेशक अविनाश मुलगीर, राजेंद्र हसनपल्ली, पंडित घोडके, संगीता राठोड, विजया बोलमवड, मंडळ अधिकारी मनोज खंदारे, तलाठी महेश जोशी व भोकर महसूल मंडळातील इतर तलाठी ,सर्व कोतवाल, यांच्यासह आयटीआयचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते