मानवत येथे श्रावणमास तपोनुष्ठान व शिवदीक्षा सोहळा
मानवत येथे श्रावणमास तपोनुष्ठान व शिवदीक्षा सोहळा
मानवत तालुका प्रतिनिधी
मानवत येथे श्री ष.ब्र.108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर बाबा यांच्या दिव्य आशीर्वादाने श्री ष.ब्र.108 सद्गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांचे तपोनुष्ठान व शिवदीक्षा सोहळा संपन्न होणार आहे.
दिनांक 5 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान 11 दिवसीय कार्यक्रमांमध्ये श्री ष. ब्र.108 सद्गुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे तपोनुष्ठान, ग्रंथराज श्री परमरहस्य पारायण, संगीत शिवपाठ व प्रवचन सोहळ्याचे आयोजन श्री अमरेश्वर मंदिर मानवत येथे करण्यात आले आहे.
तपोनुष्ठान सोहळ्यामध्ये पहाटे पाच ते सात एकांतात जप, सकाळी सात ते नऊ सामूहिक इष्टलिंग महापूजा, सकाळी नऊ ते अकरा ग्रंथराज श्री परमरहस्य पारायण, अकरा ते एक महाप्रसाद, सायंकाळी पाच ते सहा रुद्राभिषेक लिंग पूजा, सायंकाळी सहा ते सात संगीतमय शिवपाठ, व रात्री आठ ते नऊ प्रवचनाचे आयोजन केले आहे.
श्री अमरेश्वर मंदिर मानवत येथे मानवत येथील सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने भव्य तपोनुष्ठान कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमांमध्ये दिनांक 11 ऑगस्ट रविवार रोजी शिवदीक्षा कार्यक्रम तसेच दि. 12ऑगस्ट सोमवार रोजी श्री प.पू.ष.ब्र.108 वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणावर बिल्वार्पण सोहळा संपन्न होणार असून 14 ऑगस्ट बुधवार रोजी सायंकाळी प्रवचनात भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये मानवत व पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आले आहे .