मानवत येथे खुली राज्यस्तरीय भजन स्पर्धा
मानवत येथे खुली राज्यस्तरीय भजन स्पर्धा
माऊली भजन मंडळ चा पुढाकार
मानवत / प्रतिनिधी मानवत तालुक्याच्या पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेले माऊली भजन मंडळ यांच्या पुढाकारातून खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन मानवत येथे ८ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजनी मंडळास मोठ्या प्रमाणात बक्षिसांची आरास संयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे.
मानवत शहर अध्यात्माचे प्रतीक म्हणून पंचक्रोशी मध्ये नावाजलेले आहे. शहरात नेहमीच अविरत अखंड हरिनाम सप्ताह , भजन, कीर्तन व सुंदरकांड असे आध्यात्मिक कार्यक्रम चालू असतात. याच मुळे शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात अध्यात्माशी नाळ जुळलेली आहे. शहराची अध्यात्मिक ओळख राज्यभरामध्ये ओळख व्हावी यासाठी येथील माऊली भजन मंडळ यांनी भव्य अशा राज्यस्तरीय खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ८सप्टेंबर२०२४ रविवार रोजी शहरातील नेहा मंगल कार्यालय , बायपास रोड मानवत या ठिकाणी आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये ३१ हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषक २१ हजार व सन्मानाचिन्ह तर तृतीय पारितोषिक रुपये ११ हजार व सन्मान चिन्ह या सोबतच चौथे आणि पाचवे उत्तेजनार्थ बक्षीस देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट तबलावादक व उत्कृष्ट हार्मोनियम वादक यांना देखील बक्षीस देण्यात येणार आहेत. अशी माहिती माऊली भजन मंडळ चे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत यांनी दिली आहे.
या भव्य खुल्या भजन स्पर्धेचे उद्घाटन सकाळच्या सत्रात ८सप्टेंबर२०२४ रोजी पंचक्रोशीचे दैवत महामंडलेश्वर ह.भ.प. १००८ श्री. श्री अनंत विभूषित मनीषानंद महाराज यांच्या हस्ते होणार आहे.स्पर्धेचे बक्षीस वितरण च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नुकतेच नवनिर्वाचित झालेले आमदार राजेशदादा विटेकर हे आहेत. तर या स्पर्धेचे स्वागत अध्यक्ष मानवत शहराचे युवा नेते डॉ. अंकुश लाड हे असणार आहेत .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन भाऊ फड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर , ऍड् अनिरुद्ध पांडे व बाजार समिती संचालक बाळासाहेब मोरे हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मानवत नगरीचे माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत (९४२२५५७८९०), मारोतराव गडदे (९९२१८८०३७७),संतोष मगर (७७०९८५५१५७),प्रल्हाद रासवे(९४२०८८६९८४)व विष्णुपंत बेळनोर(८८०५८००४६३)यांच्याशी संपर्क साधावा तसेच संघ नोंदणीसाठी प्रवेश फी जमा करण्यासाठी फोन पे नंबर संतोष महाराज मगर फोन पे (७७०९८५५१५७) व्यंकटेश भोसकर फोन पे (९९२१८१७१७७)ह्या क्रमांक वर फोन पे करणे आवश्यक आहे असे माऊली भजन मंडळाच्या वतीने कळविण्यात आलेआहे.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त भजनी मंडळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अशा आहेत स्पर्धेच्या नियम व अटी
स्पर्धेचे प्रवेश शुल्क 1100 रुपये राहील., प्रवेश फीस दिनांक ५ सप्टेंबर २०२४ पर्यंतच घेण्यात येईल, या स्पर्धामध्ये एकूण ४० संघच घेण्यात येतील,स्पर्धेमध्ये किमान ७ तर कमाल ८ जण भजनी स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघाला एक वेळेस दुपारी जेवण व चहा नंतर 5 वाजता नाश्ता देण्यात येईल,स्पर्धेमध्ये तबला, पखवाज, हार्मोनियम, टाळ हेच वाद्य वापरणे आवश्यक आहे,स्पर्धेमध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्य वापरण्यात येणार नाही,स्पर्धेमध्ये वादक व वाद्य उदा. विना, मृदंग, हार्मोनियम, तबला संघाने आपल्या सोबत घेऊन येणे आवश्यक आहे,स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला १० मीनिट वेळ देण्यात येईल जास्त वेळ घेणारा संघ बाद करण्यात येईल,परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील,स्पर्धेमध्ये एक अभंग, गवळण किवा भारूड हे सर्व संत रचित असणे आवश्य असतील,संघामध्ये दोन गायक असणे आवश्यक आहे,प्रत्येक संघाने स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८ वाजता येणे आवश्यक आहे,अनुपस्थित संघाचा पुन्हा विचार केला जाणार नाही व प्रवेशाचे फीस परत केली जाणार नाही,स्पर्धा सकाळी ८ वाजता सुरु होईल व त्या दिवशीच संपणार आहे,स्पर्धा संपल्यानंतर त्याच दिवशी लगेचच निकाल जाहीर करून बक्षीस दिले जाईल याची नोंद घ्यावी, संघाचे सादरीकरण वेळेचे बंधन गणवेश अभंगाची निवड या बाबींना प्राधान्य दिले जाईल,सिनेमाच्या चालीवर सादरीकरण करता येणार नाही आणि कार्यालयात सराव करता येणार नाही,स्पर्धेमध्ये येणाऱ्या ४० संघामधून५ संघ निवडले जातील व त्याच पाच संघांना पुन्हा दहा मिनिट संधी देऊन त्यामधून प्रथम , द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात येईल व इतर दोन जणांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्यावी,एखाद्या कलाकारांचा दुसऱ्या संघामध्ये वापर केल्यास तो संघ बाद ठरविला जाईल,स्पर्धेमध्ये उत्कृष्ट तबला वादक उत्कृष्ट हार्मोनियम वादक यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येईल.