मानवत तालुक्यात मोबाईल व्यसनमुक्ती साठी एचएआरसी संस्थेने उचलला विडा
मानवत तालुक्यात मोबाईल व्यसनमुक्ती साठी एचएआरसी संस्थेने उचलला विडा
जि प प्रशाला मानवत ता मानवत येथे एचएआरसी तर्फे 101 पुस्तकांची आनंदी वाचनपेटी भेट
मानवत तालुका प्रतिनिधी : मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर आणि वाढता स्क्रीन टाइम मुळे शाळेतील व गावातील ग्रंथालये ओस पडली आहेत. त्या ग्रंथालयातील निराधार पुस्तके वाचक रुपी मायबापच्या प्रतीक्षेत आहेत अशा परिस्थितीत मुलांनी शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकांशी मैत्री करून पुस्तक वाचनाचा आनंद घेण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आज 06 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला मानवत ता मानवत जिल्हा परभणी या शाळेला 109 वि आनंदी वाचनपेटी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे भेट देण्यात आली.
या संस्थेमार्फत आतापर्यंत जालना, हिंगोली, परभणी, बीड व पुणे जिल्ह्यातील 109 शाळांना ही आनंदी वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, पक्षीमित्र व बालसाहित्यिक माणिक पुरी, तुकाराम साळुंके हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी वाचनाचे महत्व सांगत घरातील टीव्ही व मोबाईलचा वापर कमी करून वाचनाचे आवाहन केले. 101 पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट: या ‘आनंदी वाचन पेटी’ मध्ये 101 पुस्तकांचा खजिना असून यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, महापुरुषांची चरित्रे, शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत हे साहित्य आहे. लोकसहभागातून दातृत्व : सेलू येथील स्व. सत्यनारायण मंत्री यांच्या मासिक पुण्यस्मरण निमित्ताने ही आनंदी वाचनपेटी भेट देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ पवन चांडक मुख्याध्यापिका श्रीमती छाया गायकवाड, श्री साळुंके सर, श्री चौधरी सर, श्री मुजीब सर , श्री होगे सर, कल्पना देशपांडे, सौ प्रियंका दुमाने, सौ सपना राऊत मॅडम, गिरी मामा यांनी परिश्रम घेतले.