मानवतला ५१ फुटी रावणाचे होणार दहन; सैराट फेम आर्ची राहणार आकर्षण
मानवतला ५१ फुटी रावणाचे होणार दहन; सैराट फेम आर्ची राहणार आकर्षण
मानवत प्रतिनिधी : येथील सार्वजनिक दसरा समितीच्या वतीने विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवारी ता १२ सायंकाळी ७ च्या सुमारास ५१ फुटी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
शहरातील बसस्टँड च्या पाठीमागे पाळोडी रोड वरील मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज व शिवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या हस्ते केले जाणार आहे . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय जाधव , आमदार सूरेश वरपुडकर हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण प्रसिद्ध अभिनेत्री सैराट सिनेमा फेम प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) येत आहे तसेच प्रसिद्ध गायक नरेंद्र राठोड व त्यांचे सहकारी हे सुमुधुर गीते गाणार आहेत. यावेळी नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे.
कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक प्रा अनंत गोलाईत, श्याम चव्हाण, दीपक बराहाते, विक्रमसिंह दहे, अनंत भदर्गे, संदीप हांचाटे , जमील सय्यद, अकबर अंन्सारी , श्रीकांत देशमुख, राजेश मंत्री, गणेश दहे, ऋषींकेश बारहाते, पवन बारहाते आदींनी केले आहे .