मानवतला सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली अर्पण
मानवतला सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली अर्पण
मानवत : कॉ. सिताराम येचुरी यांचे दुःखद निधन दि. 12 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे एम्स हॉस्पिटलमध्ये झाले त्यामुळे आज माँ साहेब जिजाऊ सभागृह आठवडी बाजार मानवत येथे महाविकास आघाडीच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती शोकसभाचे अध्यक्ष माणिकराव काळे ता प्रमुख मानवत शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रमुख पाहुणे उपस्थिती बाबासाहेब अवचार राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष मानवत, संतोषराव लाडाणे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, नामदेव काळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ता अध्यक्ष, कॉ. उद्धव पौळ जिल्हा सचिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष परभणी, कॉ. दिपक लिपणे,कॉ. रामकृष्ण शेरे पाटील जिल्हा कमेटी सदस्य, शोकसभचे प्रास्ताविक कॉ. अशोक बुरखुडें यांनी केले कॉ. सिताराम येचुरी यांच्या कार्यावर बाबासाहेब अवचार, संतोष लाडाणे, कॉ. उद्धव पौळ, कॉ. रामकृष्ण शेरे पाटील कॉ दिपक लिपणे, अनिल जाधव शहर प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी संघर्ष मय जिवनावर आठवणीला उजाळा दिला सुत्र संचालन कॉ. रामराजे महाडिक यांनी केले अध्यक्षीय शोकसमारोप माणिकराव काळे यांनी केले या अभिवादन सभेत, मार्केट कमिटी सचिव शिवनारायण सारडा, कृष्णा शिंदे युवासेना ता.प्रमुख गोपाळ आबा काळे, कॉग्रेस पक्षाचे नगर सेवक अनंत मामा भदर्ग, अड. विक्रमसिंह दहे, नगर सेवक जमील भाई,सरपंच केशवरा अवचार ,सतिष काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा उपाध्यक्ष, गणेश दहे,कॉ. कुडलीक थिटे कॉ. रामेश्वर वाघमारे, उद्धवराव काळे, सुरेश दुधाणे, बालाजी रासवे, मतीन भाई काझी, रामेश्वर जाधव, गणेश वैद्य , दिपक कुमावत व इतर सर्व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.