मानवतला युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण पत्रकार संघ गणेश मंडळाचा उपक्रम
मानवतला युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण पत्रकार संघ गणेश मंडळाचा उपक्रम
मानवत प्रतिनिधी : युवती व महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मानवत तालुका पत्रकार संघ गणेश मंडळाच्या वतीने शुक्रवारी ता १३ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
शहरातील नेताजी सुभाष विद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे व त्यांच्या सहकारी युवती शालेय विद्यार्थिनी, युवती व महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणार आहेत. या कार्यक्रमास शहरातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवतीसह शहरातील अनेक महिला मंडळाच्या महिला उपस्थित राहणार आहेत .
कार्यक्रमास सर्व युवती व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक, सचिव प्रसाद जोशी, मोहन बारहाते, गोपाळ लाड, श्याम झाडगावकर, डॉ सचिन चिद्रवार, सचिन मगर, दिगंबर बाकळे, पांडुरंग जाधव, दशरथ शिंदे, रामेश्वर काष्टे, ऍड मुकुंद पाटील, आश्रोबा केदारे, अनिल चव्हाण, प्रवीण घागरे, राम दहे आदींनी केले आहे .