आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्ता

मानवतला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

मानवतला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

मानवत प्रतिनिधी
उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय उदगीर व जिल्हा अंधत्व निवारण समिती लातूर यांच्या वतीने स्वर्गीय श्रीमती गंगाबाई मोहनलाल मंत्री यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ मंगळवारी ता १६ मानवत येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .


शहरातील मेन रोडवरील माहेश्वरी मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता शिबिरास सुरुवात होणार असून शिबिरात पात्र झालेल्या रुग्णांवर उदगीर येथील नेत्र रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे . गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराचे आयोजक नंदलाल मंत्री यांनी केले आहे . नावनोंदणी साठी डॉ विजय तोष्णीवाल , रुपेश काबरा , सचिन बिर्ला , पंकज लाहोटी , शैलेश काबरा , डॉ सचिन चिद्रवार , रामानंद मंत्री यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button