मानवतला महिलांच्या कावडयात्रेस मोठा प्रतिसाद
मानवतला महिलांच्या कावडयात्रेस मोठा प्रतिसाद
मानवत सौ ममता चिद्रवार : सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मानवतच्या स्वामी आई सेवाभावी संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या महिलांच्या कावड यात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला .
सदरील कावड यात्रा सावरकरनगर भागातून कृष्ण मंदिर मार्गे बाराज्योतिर्लिंग मंदिर ते संभाजीनगर भागातील आर्य वैश्य समाजाचे कुलदैवत श्री नगरेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली .
या कावड यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी भगवान नगरेश्वरास जलाभिषेक करून दुधाचा प्रसाद वाटप केला .
तसेच नगरेश्वर मंदिराची बारा वर्षापासून सेवा करणाऱ्या, मंदिर स्वच्छ ठेवणाऱ्या महिला सौ सुमन बाहेकर व सौ आशालता महात्मे यांचा सत्कार स्वामी आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ सविता कत्रुवार यांच्या हस्ते करण्यात आला.
कावड यात्रेसाठी सौ सिद्धलक्ष्मी गुंडाळे ,सौ ज्योती गुंडाळे, सौ मुक्ताबाई ,सौ प्रतिभा वायकर ,सौ लता बंडे, सौ रायपल्ली , सौ शकुंतला बोरकर, सौ मीना घोडके यांचे सहकार्य लाभले . संभाजीनगर मधील सर्व महिला कावड यात्रेत सहभागी होऊन कावड यात्रेची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व महिलांचे संस्थेच्या वतीने सौ सिद्धलक्ष्मी गुंडाळे यांनी आभार मानले .