मानवतला डीपीला शॉर्ट सर्किट ने लागली आग कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
मानवतला डीपीला शॉर्ट सर्किट ने लागली आग कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
मानवत तालुका प्रतिनिधी : शहरातील बसस्टँड समोरील गोलाईतनगरला विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना गुरुवारी ता २२ सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली . नागरिकांच्या सतर्कतेने विजमंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवून वीज पुरवठा सुरळीत केला .
याबाबत माहिती अशी की , गुरुवारी ता २२ सायंकाळी शहरातील बसस्टँड समोरील डीपीतील ट्रान्सफर मधून ऑइल लिक होऊन शॉर्टसर्किट झाल्याने अचानक पेट घेतला . डीपीच्या खाली कचरा असल्याने आग वाढली . त्या भागातील नागरिकांनी विजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली . कर्मचारी दुर्गादास उन्हाळे , संतोष लोखंडे , शेख बाबर , दीपक सोरेकर व विशाल जाधव यांनी तात्काळ त्या भागातील वीजपुरवठा बंद करून घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले . व वीजपुरवठा सुरळीत केल्याने इतर अनर्थ टळला .