महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नांदेड (दक्षिण) निवड समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील पाटील चव्हाण, तर तालुका अध्यक्षपदी गणपतराव जामगे यांची निवड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नांदेड (दक्षिण) निवड समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील पाटील चव्हाण, तर तालुका अध्यक्षपदी गणपतराव जामगे यांची निवड
लोहा / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नांदेड (दक्षिण) निवड समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील पाटील चव्हाण तर लोहा तालुका अध्यक्षपदी गणपतराव पाटील जामगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

लोहा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष रुपेशजी पाडमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नांदेड (दक्षिण) जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
सदर बैठकीत रुपेशजी पाडमुख यांच्या मार्गदर्शनानुसार युवा पत्रकार सुनील पाटील चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी, तर गणपतराव पाटील जामगे यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच तालुका कार्यकारिणीची पुढीलप्रमाणे नव्याने स्थापना करण्यात आली :
उपाध्यक्ष – प्रदीप कुमार कांबळे,
सचिव – हनुमंत पांचाळ,
सदस्य – माधव ससाने, संग्राम चव्हाण, सिद्धार्थ महाबळे, शरद कापुरे, रवी जोंधळे
सल्लागार – विलास सावळे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना रुपेशजी पाडमुख यांनी सांगितले की, संघटनेचे कार्य गावपातळीपर्यंत पोहोचवून प्रत्येक पत्रकाराच्या अडचणींना संघटित पद्धतीने सामोरे जाण्याचे काम संघाने हाती घ्यावे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रत्येक सदस्याचा वार्षिक दोन लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या बैठकीस रुपेशजी पाडमुख, जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार, जिल्हा उपाध्यक्ष आयुब खा पठाण, सिडको सेलचे अध्यक्ष शेख मोहम्मद कलीम, लोह्यातील पत्रकार बांधव तसेच पुरोगामी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजीव तिडके सर उपस्थित होते.
सदर निवडीनंतर सामाजिक व राजकीय स्तरावरून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
बैठकीचे सूत्रसंचालन सिद्धार्थ महाबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार प्रदीप कुमार कांबळे यांनी केले.













































