महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे 25 वे ( रौप्य महोत्सव) वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे 25 वे ( रौप्य महोत्सव) वर्धापन दिन उत्साहात साजरा
उदगीर : मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे दि 03 -12-2025 रॊजी महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत विद्यापीठ वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ. बी.आर. खरटमोल सहयोगी अधिष्ठाता यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. बी.आर. खरटमोल यांच्या भाषणात विद्यापीठाने राबविलेल्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्य उपक्रम विषयी महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे पाल्य यांचे ही गुणवंत विध्यार्थी म्हणून कु. मनस्वी बालाजी खरटमोल व कु. वैदेही संतोष कुंजीर यांचा सत्कार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.महादेववाडी ता. देवणी जि. लातूर येथे “मस्त्य संवर्धन व खाद्य व्यवस्थापन” या विषयावर प्रात्यक्षिकाद्बारे सखोल मार्गदर्शन महाविद्यालयातील डॉ. ए.एस.कुलकर्णी,डॉ. व्हि.बी. सुतार, डॉ. एम.एम. गिरकर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण, चित्रकला व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. प्रसाद आवले, श्री. निशांत एस. वाकोडे, श्रीमती शोभा तांदळे, श्रीमती कविता डावरे,श्री मादळे चंद्रकांत, श्री बिरादार नितीन,श्री. चिमेगावे शिवानंद,श्री. रंगवाळ नरेश,सचिन जोशी, बाळकिशन घुगे, गणेश वडमूर्गे,हरीश सूर्यवंशी यांनी अथक परिश्रम घेतले.














































