मराठी पत्रकार परिषद नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बी.आर. पांचाळ

मराठी पत्रकार परिषद नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बी.आर. पांचाळ
*********
भोकर (तालुका प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बी.आर. पांचाळ यांची निवड करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषद मुंबई चे सरचिटणीस तथा नांदेड जिल्हा प्रभारी सुरेश नाईकवाडे यांनी 4 जून 2025 रोजी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची कार्यकारणी घोषित केली त्या कार्यकारणी मध्ये भोकर येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी बी. आर पांचाळ यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली मागील 35 वर्षापासून ते मराठी पत्रकार परिषदेची जोडलेले आहेत तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वेळा कार्यभार सांभाळला कार्याध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत होते जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे ज्येष्ठ पत्रकार एल. ए. हिरे, बाबुराव पाटील, राजेश वाघमारे, डॉ. मनोज गिमेकर, गणपत मुसळे, सिद्धार्थ जाधव, जयभीम पाटील,, शंकर कदम, लतीफ शेख बी.एस.सरोदे, सुभाष तेले यांच्यासह पत्रकारांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले