सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयीसरकारी योजनासामाजिक कार्य

मत्स्य संवर्धनातील आधुनिक तंत्रज्ञानावर घरणी शिवपूर येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

मत्स्य संवर्धनातील आधुनिक तंत्रज्ञानावर घरणी शिवपूर येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

उदगीर: जागतिक मत्स्य दिवसानिमित्त मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या वतीने शासकीय मत्स्यबीज केंद्र, घरणी शिवपूर (जि. लातूर) येथे मत्स्य व्यवसायिक व शेतकऱ्यांसाठी ‘मत्स्य संवर्धनातील आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिरीष गाथाडे, प्रादेशिक उपायुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, लातूर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी.आर. खरटमोल उपस्थित होते.उद्घाटनपर भाषणात श्री. गाथाडे म्हणाले की, “मत्स्य व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन व आर्थिक उत्पन्न वाढीस मदत मिळू शकते. शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे.”डॉ. खरटमोल यांनी मत्स्य व्यवसायातील शास्त्रीय तंत्रज्ञान, प्रशिक्षण व महाविद्यालयाकडून मिळणाऱ्या सुविधा याबाबत मार्गदर्शन करत, “शेतकऱ्यांनी उपलब्ध तांत्रिक मदतीचा पूर्ण लाभ घ्यावा,” असे सांगितले.कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अजय कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक यांनी केली. यानंतर महाविद्यालयाचे डॉ. एस.आर. यादव आणि डॉ. एस.एन. कुंजीर यांनी आधुनिक मत्स्य व्यवसाय, मत्स्य संगोपन तंत्र, जलगुणवत्ता व रोगनियंत्रण यावर सविस्तर व्याख्यान दिले.मत्स्य व्यवसाय विभाग, लातूरच्या सहाय्यक आयुक्त तेजस्विनी कराळे यांनी शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मत्स्यबीजांचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले.या प्रसंगी प्रगतशील शेतकरी ओमकार मस्कले, गुंडेराव चौसष्टे, तसेच मत्स्य व्यवसायिक सावळकर, लक्ष्मण तिकटे, विनायक कांबळे, पंढरी वाघमारे यांच्यासह विविध मत्स्य सोसायट्यांचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांच्या शंकांचे निरसन तज्ज्ञांनी केले.कार्यक्रमात डॉ. ए.टी. मरकड, डॉ. व्ही.बी. सुतार, डॉ. एम.एम. गिरकर, श्रीमती विद्या कोरे, श्रीमती मिना केंद्रे, श्रीमती शितल गिरकर, श्री. सय्यद हमजा, श्री. अजिंक्य देवकत्ते व मत्स्यबीज केंद्राचे श्री. शेख इस्माईल उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. बाळासाहेब सगर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन बिरादार, चंद्रकांत मादळे, शिवा चिमेगावे, नरेश रंगवाळ, स्वप्नील पवार, श्री. भंडे व भांडकोळी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button