आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रराजकारणसरकारी योजनासामाजिक कार्य

मंत्र्यांच्या निमंत्रणाकडे चेअरमन संघटनेने फिरवली पाठ !

मंत्र्यांच्या निमंत्रणाकडे चेअरमन संघटनेने फिरवली पाठ !

पत्रकार : जयराम देमगुंडे गुडसुर. दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी उदगीर येथील एका खाजगी मंगल कार्यालयात उदगीरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.संजय बनसोडे यांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सोबत संवाद बैठक व स्नेहभोजन मेळावा आयोजित केला होता.
तालुक्यातील चेअरमन सोयाबीन पिकविम्यासाठी आक्रमक असून, वेळोवेळी उदगीरमध्ये त्यांनी निदर्शने केली आहेत. तब्बल २ महिन्यानंतर त्यांव्याशी चर्चा करण्यासाठी आज हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे समजले. या मेळाव्याकडे मात्र चेअरमन संघटनेने पाठ फिरवली.
यावर बोलताना कौळखेडचे चेअरमन मन्मथ कोणमारे यांनी सांगितले की, चेअरमन संघटना गेल्या दोन महिन्यांपासून पिकविम्यासाठी व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. यावर जर चर्चा करायची असेल, तर ती शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय याठिकाणी बैठक लावणे अपेक्षित आहे. एका खाजगी मंगल कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे ऐनवेळी बैठकीला आणि तिथे स्नेहभोजनासाठी बोलावणे आम्हाला पटले नाही आणि आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढत असून स्नेहभोजन करण्यात आम्हास कसलाच रस नाही. आपण शासकीय कार्यालयात आम्हास चर्चेसाठी बोलवा, आम्ही तिथे उपस्थित राहू असे मत त्यांनी मांडले.
गंगापूरचे चेअरमन विवेक जाधव यांनी सांगितले की, सदर बैठकीसाठी जाण्यास चेअरमन संघटनेने सर्वानुमते बहिष्कार टाकला आहे. हुतात्मा स्मारक येथे बोलताना ना.बनसोडे साहेबांनी, पिकविमा आंदोलन हे विनाकारण केले जात आहे, यात माझी कसलीच चूक नाही. आंदोलक विष पेरण्याचे काम करीत आहेत. असा आरोप आंदोलकांवर केला आहे. आज आरोप करायचा आणि उद्या स्नेहभोजनास बोलवायचे, ही मंत्रीसाहेबांची दुटप्पी भूमिका पटली नसल्याने सर्वानुमते या भोजनावर संघटनेने बहिष्कार टाकल्याची माहिती दिली.
यावेळी चेअरमन संघटनेला मेळाव्यास निमंत्रित करण्यासाठी कृषी विभागाचे प्रतिनिधी आले असता ही जर प्रशासकीय बैठक असेल तर ती शासकीय कार्यालयात न लावता खाजगी मंगल कार्यालयात का लावण्यात आली? असे प्रश्न उपस्थित चेअरमन यांनी केला.
यावेळी बसवराज पाटील मलकापूरकर, शिरीषकुमार पाटील, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर भांगे, संगमेश्वर मिटकरी, नामदेव बिरादार, व्यंकट ढगे, रामराव पाटील, गजानन बिरादार, गंगाधर बिरादार, धोंडीबा डावळे, हणमंत मुंडे, ज्ञानोबा गुरमे, प्रल्हाद महाजन, रोहिदास लोहारे, रामराव राठोड, व्यंकट पाटील, शेषराव हेळगे, लक्ष्मणराव सोनवळे, कैलास पाटील, शिवाजी गुरमे, बापूराव राठोड, कलावती बोने, गणेश शेटकार, अण्णाराव गंभीरे, शिवाजी नीडवांचे, ज्ञानेश्वर गायकवाड, तानाजी डावले, शिवराज पाटील, प्रदीप पाटील, गुरुनाथ आंबेगावे, वीरभद्र पाटील, वैजनाथ केसगिरे, अशोकराव माने यांच्यासह तालुक्यातील चेअरमन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button