Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य
भोकर शहरात गोपाल काल्या निमित्त विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रम
भोकर शहरात गोपाल काल्या निमित्त विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रम
***************
भोकर( तालुका प्रतिनिधी) श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या गोपालकाला निमित्त शहरात विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला
26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्म सोहळा विविध ठिकाणी साजरा करण्यात आला 27 ऑगस्ट रोजी गोपालकाला निमित्त शहरात दहीहंडी कार्यक्रम विविध ठिकाणी करण्यात आले श्रीकृष्ण मंदिर किनवट रोड श्रीकृष्ण मंदिर उमरी रोड व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम भोकर येथे लहान बालकांनी दहीहंडी कार्यक्रम साजरा केला,श्रीकृष्ण राधा व सवंगडी गवळणी असा वेश बालकांनी धारण केला होता दहीहंडी फोडून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष बापूराव पा.सोनारीकर,संचालक प्रकाश मामा कोंडलवार, सहसचिव बी.आर.पांचाळ,गणेश गुरुजी,शंकरराव देवठाण कर,अवधूत राजुरे, विकास कांडलीकर, यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते