भोकर विधानसभा मतदार संघात विकास केला असेल तर नेत्याला दारोदार फिरण्याची का वेळ येत आहे
भोकर विधानसभा मतदार संघात विकास केला असेल तर नेत्याला दारोदार फिरण्याची का वेळ येत आहे
****************
दादाराव ढगे पाटील यांचा सत्ताधारी मंडळींना सवाल
****************
इंजि.कु.दामिनी ढगे यांची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी
***************
भोकर (तालुका प्रतिनिधी) गेली 40 वर्षापासून भोकर विधानसभा मतदार संघात सत्ता उपभोगलेल्या मंडळींनी मतदार संघाचा काय विकास केला? शेतीला सिंचनाची व्यवस्था मिळाली नाही,सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग मिळाला नाही केवळ चार दोन लोकांना मोठे करण्यात आलं एकाच घराण्यातील किती लोकांना निवडून द्यावं इतर लोकांनी राजकारण करू नये का असा सवाल उद्योजक दादाराव ढगे पाटील यांनी भोकर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माझी मुलगी इंजि.कु.दामिनी ढगे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली असून आपण निवडणूक लढविण्यासाठी तयारीनिशी उतरलो आहोत असे ठामपणे सांगितले आहे. भोकर विधानसभा मतदार संघाने संबंधित नेत्यांच्या वडिलांना नंतर त्यांना निवडून देऊन मुख्यमंत्री केले खासदार केले त्यानंतर मंत्री झाले त्यांच्या पत्नीला सुद्धा निवडून दिले आणि आता आपल्या मुलीला निवडणुकीसाठी त्यांनी समोर केले आहे ही घराणेशाही किती दिवस चालणार आहे?आपल्या सत्तेच्या काळात त्यांनी फक्त आपल्या जवळच्याच चार-पाच लोकांनाच मोठे केले,इतर लोकांना मोठे झालेले त्यांना बघावे वाटत नाही,आता म्हणत आहेत काही लोकांना नोकरी लावतो आतापर्यंत त्यांनी नोकऱ्या का लावल्या नाहीत, भोकर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न अद्यापही मिटला नाही उर्ध्व पैनगंगा प्रकल्प भोशी येथून प्रकल्प प्रकल्प उभारून भोकर तालुक्याला पाणी देता आले असते मात्र ते करण्यात आले नाही, तालुक्यात एखादा उद्योग आजपर्यंत आणला नाही एमआयडीसी सुद्धा नावालाच आहे आज पर्यंत तिथे काहीच उद्योग आले नाहीत, सत्ताही एकाच घराण्याकडे किती दिवस राहायची इतरांना संधी का नाही या भागाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी इंजिनीयर दामिनी ढगे यांनी मतदारसंघात मतदारांशी संवाद साधला असता अनेक मतदारांनी आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे आपण मागणी केली असून उमेदवारी मिळाल्यास सर्व ताकदीनिशी आपण निवडणुकीत उतरणार आहोत असेही दादाराव ढगे पाटील म्हणाले