भोकर विधानसभा क्षेत्रातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
भोकर विधानसभा क्षेत्रातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
भोकर तालुका प्रतिनिधी : 85 भोकर विधानसभा मतदार संघ व लोकसभा पोटनिवडणूक 2024 च्या अनुषंगाने व आज आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी यांनी करावयाची कामे याबाबतीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या.
भोकर येथे उपविभागीय कार्यालयात दिनांक 18 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राऊत यांनी एक दिवस आधी मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कोणत्या संभाव्य चुका होऊ शकतात याबाबत पण सविस्तर मार्गदर्शन केले व त्या चुका होऊ नयेत यासाठी संबंधित झोनल अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन झोन मधील सर्व मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबाबत सूचना दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रुमची पाहणी केली. यावेळी . प्रविण मेंगशेट्टी (निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी. विनोद गुंडमावर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकर . रेणुकादास देवणीकर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकर. आनंद देऊळगावकर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकर व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.