सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

भोकर येथे आर्ट ऑफ लीव्हिंगचा हैपिनैस कार्यक्रम

भोकर येथे आर्ट ऑफ लीव्हिंगचा हैपिनैस कार्यक्रम
************

भोकर (तालुका प्रतिनिधी ) प.पू. श्री श्री रविशंकरजी यांचा , आर्ट ऑफ लिव्हिंग 6दिवशीय कार्यक्रम भोकर येथे जयकेदारनाथ कौम्पलैक्स मध्ये आयोजित करण्यात आला होता समारोपीय हॅपिनेस कार्यक्रम दि 20 एप्रिल रोजी पार पडला .
शहरातील व्यापारी, अधिकारी, युवक ,गृहिणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील 40 हून अधिक साधकांनी यात सहभागी होऊन आनंदाची अनूभूती घेतली यात योगासने , प्राणायाम , सूदर्रशन क्रिया शिकल्याने याचा नियमितपणे पूढेही अभ्यास आपण करून जीवन उत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प सहभागींनी घेतला.


मानवीय मूल्यांचा अविष्कार या दरम्यान झाल्याने समारोपाच्या दिवशी सहभागींनी शहरातील श्री पशूपतिनाथ मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान केले.
भोकर शहरात मागील 22 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य सुरु असून येथे नियमितपणे साधकांसाठी फालौअप व प्रोग्राम सुरू असतात म्हणून याचा लाभ शहरातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक राजेश्वर भूरे यांनी केले आहे.
सदरिल सहा दिवसीय कार्यक्रमासाठी प्रशिक्षक राजेश्वर भूरे , अरूणा भूरे , डॉ विठ्ठल माने होते तर व्हालेंटिअर सोपान तोटावाड , मनीषा साकळकर, डॉ मनीषा माने, आकाश गौड आदींनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button