भोकर येथे आई तुळजाभवानी दुर्गा महोत्सव समितीने स्थापित केली माती पासून बनवलेली मूर्ती
भोकर येथे आई तुळजाभवानी दुर्गा महोत्सव समितीने स्थापित केली माती पासून बनवलेली मूर्ती
****************
वेलनेस मोफत शिबिराचा 500 रुग्णांनी घेतला लाभ
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी) शहरातील आई तुळजाभवानी दुर्गा महोत्सव समितीने माती पासून बनवलेली पर्यावरण पूरक दुर्गा मूर्तीची स्थापना केली त्यासोबतच महादेवाची देखील मातीने बनवलेल्या मूर्तीची स्थापना केली असून विविध उपक्रम महोत्सव समितीच्या वतीने राबविले जात आहेत.
भोकर शहरामध्ये चाळीस दुर्गा मूर्तींचे स्थापना करण्यात आली असून गुंफा येथील आई तुळजाभवानी दुर्गा महोत्सव समितीच्या वतीने पर्यावरण पूरक मातीची दुर्गा मूर्ती व महादेवाची मूर्ती स्थापित केली आहे सामाजिक उपक्रम देखील या समितीकडून राबविण्यात येत असून विविध रोगावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार मिळावे म्हणून मोफत वेलनेस शिबिर देखील घेण्यात येत आहे
या शिबिराचा 500 हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे सदर दोन्ही मुर्त्या कलकत्ता येथून मागविण्यात आल्या आहेत अतिशय सुंदर अशीच सजावट आणि कमानीचा देखावा करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे येथील सर्व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजक युवा कार्यकर्ते संदीप पाटील गौड हे असून मंडळाचे अध्यक्ष अंकुश रतनवार,बबलू देशमुख,रामू देशमुख,मुसांडे गुरुजी,आप्पारावजी, एड.पवन वचेवार,महेश सोमनवार, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत