भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाने धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेऊन जपली उत्सवाची परंपरा
भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाने धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेऊन जपली उत्सवाची परंपरा
****************
भागवत कथा,राम कथा,किर्तन,व्याख्यान,सत्संग कार्यक्रम
****************
विसर्जनाच्या दिवशी 25 हजार भाविकांसाठी महाप्रसाद
****************
भोकर (बी.आर.पांचाळ) भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाने धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने गणेश उत्सवाची परंपरा जपली आहे,दररोज भाविकांसाठी अन्नदान,भागवत कथा,राम कथा,आरोग्य शिबिर,सत्संग,कीर्तन,प्रवचन असे विविध कार्यक्रम राबवून सामाजिक प्रबोधनाचे काम केले विसर्जनाच्या दिवशी25 हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
गणेश उत्सवाची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वी लोकमान्य टिळकांनी केली त्यावेळी गणेश उत्सव सामाजिक प्रबोधनाचे माध्यम बनला होता,स्वातंत्र्याची चळवळ त्याकाळी उत्सवाच्या माध्यमातून उभी करण्यात आली, धार्मिक भावनेतून समाजाचे संघटन झाले,सामाजिक प्रबोधन झाले, खऱ्या अर्थाने त्याकाळी धार्मिक उत्सव म्हणजे सर्व समाजाची एकता होती धार्मिक भावनेची जोड लावण्यात आली होती त्यानंतरच्या काळात आजच्या परिस्थितीमध्ये गणेश उत्सव म्हणजे वेगळ्या पद्धतीचा उत्सव झाला नाचगाणे मनोरंजन विसर्जन मिरवणुकीत डीजे लावून वेगवेगळ्या गाण्यावर नाचणे अशा पद्धतीचा आजचा गणेशोत्सव झाला असून खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने हा उत्सव सुरू केला त्याच अर्थाने आजही समाजात मोठे प्रबोधन करणे गरजेचे आहे,राष्ट्रीय एकात्मता,राष्ट्रपुरुषांचे विचार जोपासणे,महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी जनजागृती,विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन,व्यसनमुक्तीचा संदेश,बरबाद होत चाललेली युवा पिढी अशा सर्व बाबीने गणेश उत्सव साजरा करणे गरजेचे आहे,आजचा गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे माध्यम बनला पाहिजे मात्र असे होताना दिसत नाही आजच्या उत्सवाचे स्वरूप सामाजिक प्रबोधन असे बनले पाहिजे
भोकर मध्ये धार्मिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम
***************
भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून मागील 20 वर्षापासून सामाजिक प्रबोधनाचे अध्यात्मिक कार्यक्रमात घेतले जातात चालू वर्षाच्या उत्सवात प्रारंभी वे.शा.सं.रवी गुरु जोशी यांच्या हस्ते विधीवत पूजा करून मंत्र उच्चाराणे स्थापना करण्यात आली श्रीमद् भागवत कथा,राम कथा,आरोग्य शिबिर ,सत्संग,प्रवचन कीर्तन, दररोज अन्नदान असे कार्यक्रम घेण्यात आले प.पू.बालयोगी आचार्य गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून राम कथा अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आली, ह.भ. प.गजानन महाराज कळमनुरीकर यांनी श्रीमद् भागवत कथा चांगल्या प्रकारे सांगितली, ह.भ.प.प्रा.डॉ.प्रशांत महाराज ठाकरे अकोला यांचे प्रबोधनात्मक किर्तन झाले, महंत प्रभाकर बाबा कपाटे यांनी प्रवचनांमधून धर्म जागरणाचा विषय मांडला, डॉ.संदेश मालू यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले,डॉ.गंगाधर पांचाळ यांनी अस्थी रोगासाठी रुग्णांची मोफत तपासणी केली विसर्जनाच्या दिवशी मानाच्या पालखीच्या गणपतीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली त्याच दिवशी मोंढा येथील माऊली धाम येथे ,25हजार भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था अतिशय नियोजनबद्ध रीत्या करण्यात आली होती सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले