भोकर येथील शिवमहापुराणकथेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली
भोकर येथील शिवमहापुराणकथेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली
********
भोकर (तालुका प्रतिनिधी) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 21 ऑक्टोबर रोजी भोकर येथील शिवमहापुराण कथेत सायंकाळी 4.58 वाजता कथा प्रवक्ते प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या उपस्थितीत मंडपातील सर्व भाविकांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली.
संत श्री नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भोकर येथे शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून आपल्या सुमधुर रसाळ वाणीतून परमपूज्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्य जी महाराज हे कथा सांगत आहेत संत नामदेव महाराजांचे चरित्र आणि शिवमहापुराण कथा यामध्ये श्रोते तलीन होत असून संतांच्या संगतीने ईश्वराची प्राप्ती होते ईश्वर भक्तीचा मार्ग धरा असे सांगून शिवपार्वती विवाह नंतरच्या कथेत बाप किती कष्ट करून आपल्या मुलींना शिकवतो त्यांच्यासाठी हाडाची काड करतो मुलींना तळ हातावरल्या फोडासारखा जपतो मात्र आजकाल मुली हे सारं विसरून एका दिवसात बदलून जातात हे वाईट वाटते त्यासाठी मुलींनी संस्कारक्षम बनाव शिकून खूप मोठ व्हावं पण आपल्या बापाची मान खाली जाईल अशी वागणूक कधीच जीवनात करू नये असेही ते म्हणाले 21 ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रारंभी राष्ट्र संतांचे कार्य महान असून त्यांची शिकवण सर्वांसाठी प्रेरणा देते असे सांगून4. 58 वाजता मौन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी भाविक भक्त महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते