भोकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त.
भोकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त.
************
भोकर /प्रतिनिधी : भोकर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवरील दोन व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीत 21 सप्टेंबर रोजी सकाळी जमीन दोस्त करण्यात आले यावेळी भोकर चे तहसीलदार सुरेश घोळवे, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी वर्षभ पवार, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मार्कड यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्या मार्फत हट्टविण्यात आले त्यामुळे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला असून येथे नगरपरिषदेने लवकरात लवकर सुशोभीकरण करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
भोकर शहरातील सर्वात महत्त्वाचा वर्दळीचे ठिकाण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या चौका मध्ये पोलीस स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नियोजित जागा आहे मात्र शहरातील पांडुरंग इंगळे व दिलीप उत्तरवार या दोन व्यापाऱ्यांनी या जागेवर अतिक्रमण करून शासनाला अंधारात ठेवून या जागेवरचा कबाला मिळवून ते अत्यंत गरीब आहोत म्हणून कबाल्याच्या आधारावर यापूर्वी ज्या ज्या वेळेस अतिक्रमण हटवण्याची सूचना देण्यात आली त्या त्यावेळी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावून येथे तात्पुरता स्टे मिळवत होते परंतु आंबेडकरी जनतेच्या रेट्यामुळे प्रशासनाने सदरील दोन व्यापाऱ्यांची दुसरीकडे असलेल्या करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचे न्यायालयात सिद्ध केल्याने न्यायालयाने साधारणपणे एक महिन्यापूर्वी सदरील दोन व्यापाऱ्यांचे कबाले रद्द करण्यात आले होते त्यामुळे सदरील जागेवरच अतिक्रमण हटवणे प्रशासनाला भाग होते परंतु त्या मध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी विलंब होत असल्याकारणाने व येणाऱ्या काळात निवडणूक आचारसंहिता लागेल व अतिक्रमण हटवण्याचा विषय पुन्हा लांब लांबणीवर जाईल याभीतीपोटी येथील जाणकार पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त् एल ए हिरे, डॉ. मनोज गीमेकर , पत्रकार सुभाष तेले, उद्योजक दत्त भाऊ डोंगरे , पत्रकार सिद्धार्थ जाधव , पत्रकार शंकर कदम, रिपाई चे तालुकाध्यक्ष जय भीम पाटील, संतोष डोंगरे, पत्रकार मनोज शिंदे आदी कार्यकर्त्यांनी 20 सप्टेंबर रोजी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन सात दिवसाच्या आत अतिक्रमण नाही हटवल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेश घोळवे यांनी मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाला योग्यता सूचना देऊन लवकरात लवकर अतिक्रम हटवण्याच्या कामाला आरंभ करण्याच्या सूचना दिल्यामुळे सदरील ठिकाणचे अतिक्रमण तातडीने काढण्यात आलेमागील 40 वर्षापासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा विषय कायमस्वरूपी निकाली काढण्यात आला असून प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्यास सुरुवात सकाळी सकाळी अंदाजे साडेसहा ते सातच्या दरम्यान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यामार्फत हटविण्यात आले असून भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र मार्कड यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ही या ठिकाणी लावला होता