भोकर येथील जि.प.केंद्रीय नूतन शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील शाह
भोकर येथील जि.प.केंद्रीय नूतन शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील शाह
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद केंद्रीय नूतन शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील प्रवीणभाई शाह यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश चिंतलवाड यांची निवड करण्यात आली.
भोकर येथील जि.प.केंद्रीय नूतन शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी प्रथम पालक मेळावा घेऊन सदस्य निवडण्यात आले त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी अध्यक्ष निवडीसाठी मतदान घेण्यात आले या निवडीमध्ये सुनील शाह हे अध्यक्षपदी निवडून आले उपाध्यक्ष प्रकाश चिंतलवाड सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे, इंदुताई कदम,लक्ष्मण श्रीरामवार, दत्ता सावतकर,ज्योती तलकोतुलवार, पूजा कुलकर्णी,गोपीनाथ मुंडकर आधी सदस्यांची निवड झाली निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पट्टेवाड, केंद्रप्रमुख चक्रवार, सहशिक्षक जाधव,प्रमोद पाटील ,कोळगावकर,भंडरवाड, खंदारे यांनी परिश्रम घेतले नूतन शालेय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले