आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रचालू घडामोडीताज्या बातम्याराजकारण

भोकर मतदार संघ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ठरणार” अवघड “वाट

भोकर मतदार संघ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ठरणार” अवघड “वाट
****************

भोकर( तालुका प्रतिनिधी) मराठवाड्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जाणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाला गळती लागेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली,मात्र परिस्थिती उलट झाली,अशोकराव चव्हाण यांनी भाजपात केलेला प्रवेश अनेक काँग्रेसच्या निष्ठावंतांना अजूनही पचणी पडला नाही उलट काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पुन्हा सक्रिय झाले बाजूला पडलेल्या कार्यकर्त्यांना शक्ती आली,अशा अनेक कार्यकर्त्यांची वज्रमुठ तयार झाली, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बळ वाढलेले दिसले,भाजपाने आखलेला डाव उलटला अशोकराव चव्हाण यांनी आखलेली राजकीय नीती” उलटी” झाली,आपल्या भविष्यातील राजकीय वारस ठरविण्यासाठी श्रीजया चव्हाण यांना त्यांनी पुढे आणले नव्हे भोकर विधानसभा मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे नाव पुढे येऊ लागले मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला भाजपाचा उमेदवार निवडून आणता आला नाही मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला आपली पसंती दर्शविली म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला धोक्याची घंटा आहे आणि खा.अशोकराव चव्हाण यांच्या नजरेतील श्रीजया चव्हाण यांचा राजकीय प्रवास” खडतर” दिसू लागला आहे.
भोकर विधानसभा मतदार संघावर काँग्रेस पक्षाच्या नावाने अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व मोठे झाले भोकर मतदार संघातील जनतेने त्यांना मुख्यमंत्री बनवायचे म्हणून प्रचंड बहुमत दिले 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील लोकसभेसाठी अशोकराव चव्हाण यांना तर विधानसभेसाठी अमिता ताई चव्हाण यांना जनतेने निवडून दिले,पुन्हा 2019 मध्ये विधानसभेसाठी त्यांना जनतेने निवडून दिले सार्वजनिक बांधकाम मंत्री पद त्यांना मिळाले या भागात विकास निधी त्यांनी कधीही कमी पडू दिला नाही मोठ्या प्रमाणावर विकासकामे या भागात झाली लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश केला भाजपाकडून त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेण्यात आले मात्र अशोकराव चव्हाण हे भाजपात जाणे हा विषय भोकर मतदार संघातील जनतेला आवडलेलाच नाही,काँग्रेस पक्षात असताना आम्ही अशोकराव चव्हाण यांना एवढे मोठे करूनही त्यांनी भाजपात का प्रवेश केला,हाच विषय लोकांच्या मनामध्ये घोंगावत होता म्हणूनच लोकसभा निवडणुकीतील उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना जनतेने स्वीकारले नाही खा.अशोकराव चव्हाण हे प्रचाराला गावागावात फिरले परंतु मतदारांनी मनावर घेतलेच नाही,काँग्रेसची निष्ठावंत मंडळी कमी प्रमाणात असताना सुद्धा काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना लोकांनी पसंती दर्शविली हाच मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अवघड “वाट” ठरणार आहे, खा.अशोकराव चव्हाण यांच्या सुकन्या श्रीजया चव्हाण यांची येणाऱ्या विधान सभेतील राजकीय वाटचाल खडतर दिसून येऊ लागली आहे.

अवघड” वाट” सोपी करण्यासाठी कसोटीचे प्रयत्न ?
***************

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी मतदारांना गावोगावी जाऊन आवाहन केले मात्र मतदारांनी त्यांचे आवाहन ऐकले नाही,भाजपाने राज्यांमध्ये केलेली पक्षाची तोडफोड,ईडीचा ससेमीरा,शेतकऱ्यांचे प्रश्न,बेरोजगारांचे प्रश्न याबाबत भाजपा बद्दल ग्रामीण भागात प्रचंड नाराजी होती,म्हणून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना मतदारांनी निवडून दिले,भाजपाची हायटेक प्रचार यंत्रणा होती सत्ताधारी पक्ष असताना देखील काँग्रेस पक्षाला या भागातील मतदारांनी उंचीवर नेले म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची वाट “अवघड” दिसत असून विधानसभेसाठी भाजपाकडून श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाली तर खूप मोठे प्रयत्न करावे लागतील काँग्रेस पक्षाकडून दिग्गज उमेदवार येण्याची शक्यता आहे इतर पक्षाचे उमेदवार देखील उभे राहू शकतात भाजपा बद्दल नाराजीचा सूर असताना आणि श्रीजया चव्हाण ह्या राजकारणात नवख्या असताना भाजपाला मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button