भोकर तालुक्यात रावणगाव येथे वीज पडून म्हैस दगावली
भोकर तालुक्यात रावणगाव येथे वीज पडून म्हैस दगावली
*************
भोकर (तालुका प्रतिनिधी) तालुक्यात मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली असून 10 व 11 जून रोजी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला 11 जुन रोजी रावणगाव येथे शेतात झाडाखाली बांधलेल्या म्हशीच्या अंगावर वीज कोसळल्याने म्हशीचा मृत्यू झाला.
भोकर तालुक्यात गेले दोन दिवसापासून वादळे वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला 10 जून रोजी प्रचंड विजांच्या कडकडाटासह सायंकाळी पाऊस झाला 11 जुन रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान आकाशात काळे ढग जमा झाले पावसाचे थेंब येण्यास सुरुवात झाली चांगल्या प्रकारे तालुक्यात पाऊस झाला रावणगाव येथे सटवाजी दिगंबर आयतोड यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या म्हशीच्या अंगावर दुपारी 4 वाजता वीज कोसळल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला याबाबत तहसील कार्यालयाला माहिती मिळाल्याने तहसीलदार यांच्या मार्फत घटनेचा पंचनामा करण्यात आला विज पडून म्हैस दगावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे