भोकर तालुक्यात मुसळधार पाऊस…
भोकर तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने खरीप पिके झाली जलमय; किनी मंडळात झाला अतिवृष्टीने पाऊस
***************
भोकर( तालुका प्रतिनिधी)
चालू वर्षाच्या पावसाळ्यात पिकांना पुरेल एवढाच पाऊस पडत राहिला ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने जोरदार सुरुवात केली 1 सप्टेंबर रोजी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिके जलमय झाली,किनी मंडळामध्ये अतिवृष्टीने पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्या नाल्यांना पूर आले आहेत.
भोकर तालुक्यात चालू वर्षाच्या खरीप हंगामात जून महिन्यापासूनच मोठा पाऊस झाला नाही पेरणी झाल्यानंतर पिकांना पुरेल एवढाच पाऊस पडत राहिला ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने सुरुवात केली1 सप्टेंबर रोजी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला 31 ऑगस्ट च्या रात्री रात्रभर पाऊस चालूच होता दुसऱ्या दिवशी 1 सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाने मुसळधार वृष्टी चालू ठेवली होती त्यामुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत खरीप पिकामध्ये पाणी साचून राहिले आहे
किनी मंडळात झाली अतिवृष्टी; नदी नाल्यांना पूर
****************
चालू वर्षाच्या पावसाळ्यात आजपर्यंत नदी नाल्यांना पुर येईल असा पाऊस झालाच नव्हता पिकापुरता पाऊस झाल्याने नदी नाले तलाव भरले नव्हते ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने सुरुवात केली 1 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला कीनी मंडळात अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना पूर आले आहेत एक सप्टेंबर रोजी तालुक्यात 65. 50 मिलिमीटर पाऊस झाला आजपर्यंत 616 मिलिमीटर पावसाचे नोंद झाली वार्षिक सरासरीच्या 63% पाऊस झाला भोकर मंडळात 62.5 मिलिमीटर मोघाळी मंडळात 56.8 मिलिमीटर मातुळ मंडळात 51.0 मिलिमीटर किनी मंडळात 95.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तालुक्यात प्रथमच मोठ्या पावसाची सुरुवात झाली या पावसामुळे खरीप पिकामध्ये पाणी साचले नदिनाल्यांना पूर आले, दमदार पाऊस झाल्याने खरीप पिकांना संजीवनी मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे