भोकर तालुक्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची जय्यत तयारी सुरू: भरमसाठ फी वसुली करण्यासाठी केले जाते नियोजन
भोकर तालुक्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची जय्यत तयारी सुरू: भरमसाठ फी वसुली करण्यासाठी केले जाते नियोजन
***************
भोकर प्रतिनिधी-बी.आर.पांचाळ – 15 जून रोजी शाळा सुरू होत असल्याने तालुक्यात इंग्रजी शाळांची जाहिरात बाजी मोठ्या प्रमाणावर झाली,अनाधिकृत चालू असलेल्या इंग्रजी शाळांच्या फी वसुलीचा धंदा चांगला जमविण्यासाठी इंग्रजी शाळांचे आकर्षण केले जात आहे भरमसाठ फी वसुली करून इंग्रजी शाळांच्या नावाखाली पालकांची मात्र आर्थिक लूट होत असतानाही शिक्षण विभाग काहीच कारवाई करत नसल्याचे चित्र दरवर्षीच दिसत आहे.
भोकर तालुक्यात नोंदणीकृत इंग्रजी शाळा काही आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर फीस भरावी लागते कपडे,शूज इतर साहित्य असे करून जवळपास 25 हजार रुपयांच्या जवळपास वार्षिक फीस इंग्रजी शाळांमध्ये पालकांना भरावी लागत आहे, ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांचे आकर्षण वाटू लागल्याने शहरांमधील इंग्रजी शाळाकडे त्यांचा ओढा वाढला आहे, पालकांना मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागत असून इंग्रजीच्या नावाखाली शिक्षणाचे आर्थिक ओझे भरमसाठ वाढत आहे, ग्रामीण भागातील लोकांना परवडणारे नाही, जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांना नको वाटू लागली आहे, शासन जिल्हा परिषद शाळावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत असून काही शाळांचा दर्जा चांगला आहे मात्र तिथे विद्यार्थी शिकायला तयार नाहीत, शिक्षकांना शासन मोठ्या प्रमाणावर पगार देते शाळांना सुविधा देते मात्र विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी कमी होताना दिसत आहे.
भोकर मध्ये चालतात अनाधिकृत इंग्रजी शाळा
***********
भोकर शहरात अनाधिकृत एलकेजी, युकेजी, म्हणून इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, गल्लीबोळात इंग्लिश स्कूल अशा नावाने शाळा काढण्यात येत आहेत,दरवर्षी नवीन शाळा उघडतात या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षका दहावी बारावी पासच्या असून 2 ते 3 हजार रुपये महिना त्यांना देण्यात येतो, पालकाकडून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रित्या फिस वसूल करतात,पावती दिल्या जात नाही, सामान शाळेमधूनच घ्यावे लागते कपडे शाळेतूनच घ्यावे,बूट,शूज व इतर सामान खरेदी करावे लागते जवळपास 15 ते 20 हजार रुपये खर्च पालकांना येतो शहरात अशा प्रकारे इंग्रजी शाळांच्या नावाखाली पालकांची लूट केली जात असून शिक्षण विभाग मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही अनधिकृत रित्या शाळा थाटून फी वसूल करणाऱ्या इंग्रजी शाळांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे,जाहिरातबाजी करून भोकर शहरात इंग्रजी शाळांनी बाजार मांडला आहे, फी वसुलीचा धंदाच या शाळांनी सुरू केला असून शिक्षण विभागाने अशा शाळांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे