आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रक्राईम वार्ताग्रामीण वार्ता

भोकर तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच

भोकर तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच
****************

वेगवेगळ्या अपघातात 4 दिवसात 6 जणांचा मृत्यू ****************

भोकर मध्ये रेल्वे उड्डाण पुलाजवळ कार अपघातात 1 जण दगावला

भोकर( तालुका प्रतिनिधी) भोकर तालुक्यात 23 जुलै पासून अपघाताची मालिका सुरूच असून वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे 26 जुलै रोजी रात्री रेल्वे उड्डाण पुलाच्या संरक्षण भिंतीला कार धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला यामध्ये4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते चकचकीत झाल्याने वाहनांची गती वाढली आहे यामुळे अपघातांचे प्रमाण आहे वाढले असून 23 जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान भोकर म्हैसा रोडवर पिंपळढव गावाजवळ दोन दुचाकीचा अपघात होऊन4 जणांचा मृत्यू झाला. 25 जुलै रोजी रात्री नऊ तीस वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रामदास दिगंबर कंदेवाड( 33)रा.पिंपळढव यांचा मृत्यू झाला. 26 जुलै रात्री नऊ वाजताच्या दरम्यान नांदेडहून किनवटकडे जात असलेली ईरटीका कार क्रमांक एम एच 14 डी एन 68 48 ही भोकर शहरात आल्याने रेल्वे उड्डाण पुलाच्या प्रवेशा जवळील डाव्या बाजूच्या संरक्षक भिंतीला धडकल्याने अर्धा कारचा भाग चिरत गेला त्यामुळे चालक व बाजूला बसलेले गंभीर जखमी झाले होते अपघात होताच सेवाभावी वृत्तीच्या नागरिकांनी कारमधील लोकांना बाहेर काढले जखमीना भोकर ग्रामीण रुग्णालयात नेले असता गंभीर जखमी झालेला चालक किशोर मालू कांबळे (42)रा.दराडी ता.उमरखेड यास वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोहेका दीपक कंधारे,राजू गुंडेवाड यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली प्रेम अमरसिंग मसे (40)बेबी प्रेम मसे( 30)दक्ष प्रेम मसे (15)अनिल नेमानीवार (50)रा.किनवट हे जखमी झाले त्यांच्यावर प्रथमोपचार करून नांदेडला पाठविण्यात आले अपघाता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे भोकर तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून 4 दिवसात 6 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत 24 जुलै रोजी भोकर नांदेड रोडवर वाकद गावाजवळ खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते चांगले झाले असले तरी वाहन चालकांनी आपली वाहने कमी वेगाने चालवून अपघात टाळणे गरजेचे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button