भोकर तालुक्यातील रेनापुर सुधा प्रकल्प ओसंडून वाहू लागला
भोकर तालुक्यातील रेनापुर सुधा प्रकल्प ओसंडून वाहू लागला
****************
गाळ काढल्याने 10 कोटी लिटर पाणी क्षमता वाढली
*************
भोकर( तालुका प्रतिनिधी)तालुक्यातील सर्वात मोठा असलेला रेनापुर सुधा प्रकल्प 1 सप्टेंबर रोजी ओसंडून वाहू लागला असून 7.43 द.ल.घ.मी.पाणीसाठा तलावात झाला आहे 100% तलाव भरल्याने भोकर शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
भोकर तालुक्यात चालू वर्षाच्या पावसाळ्यात जून पासून साधारण पाऊस पडत राहिला पिकांना पुरेल एवढाच पाऊस पडत होता त्यामुळे कुठल्याच नदी नाले तलावामध्ये विहिरीमध्ये पाणी साचले नव्हते ऑगस्ट महिना संपत येत होता तरी पाणीसाठा तलावामध्ये साठला नव्हता 31 ऑगस्ट च्या रात्री पावसाने जोरदार सुरुवात केली1 सप्टेंबर रोजी दिवसभर मुसळधार दृष्टीने पाऊस झाला आणि नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले सर्वात मोठा असलेला सुधा प्रकल्प 100% भरला असून 7.43 दलघमी पाणीसाठा भरून पाणी वाहत आहे
गाळ काढल्याने10कोटी लिटरने साठवण क्षमता वाढली
****************
समृद्ध भोकर अभियान अंतर्गत उन्हाळ्यामध्ये सुधा प्रकल्पातील गाळ काढण्यात आला शेतकऱ्यांना हा गाळ मोफत नेऊन शेतीमध्ये टाकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता त्यामुळे 10 कोटी लिटरने तलावाची पाणी साठवण क्षमता वाढली आहे भोकर शहरातील पाणीपुरवठा योजना सुधा प्रकल्प मध्ये असून भोकर शहराला येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही बाब अत्यंत महत्त्वाची झाली जून पासून साधारण पाऊस होता नदी नाले तलाव कोरडेच होते मात्र 1 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने बहुतांश नदी नाले तलावामध्ये पाणी साठले आहे सुधारित प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे