“भोकर ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य ” दिन साजरा
“भोकर ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य ” दिन साजरा
**************
भोकर (तालुका प्रतिनिधी) तालुका विधी सेवा समिती भोकर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम/ प्रेरणा प्रकल्प, व ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनानुसार भोकरदन ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष .आर.एस. इरले सह न्यायाधीश भोकर , प्रमुख पाहुणे .डी.डी.माने न्यायाधीश भोकर, डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, डॉ.शाहू शिराढोणकर, मानसउपचार तज्ञ, डॉ संदेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रास्ताविक व सूत्र संचालन सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले.
मानसिक आरोग्य बदल सविस्तर मार्गदर्शन व घ्यावयाची काळजी या बाबत डॉ शाहू शिराढोणकर मानसउपचार तज्ञ यांनी केले. अध्यक्षशीय समारोप .आर.एस. इरले सह न्यायाधीश भोकर यांनी केला.मा
नसिक रुग्ण यांना औषध उपचार देण्यात आला.यावेळी न्यायालय भोकर येथील दिलिप मचेवार, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम/प्रेरणा प्रकल्प नांदेड येथील अरुण वाघमारे, रुपाली मस्के, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.