भोकरमध्ये कृषीसेवा केंद्र चालकाकडून कपाशीच्या बियाणांची ज्यादा दराणे विक्री
भोकरमध्ये कृषीसेवा केंद्र चालकाकडून कपाशीच्या बियाणांची ज्यादा दराणे विक्री
******************
कारवाई करण्याबाबत शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन
**************
भोकर(तालुका प्रतिनिधी) येथील कृषी सेवा केंद्र दुकानदाराकडून कपाशीच्या बियाणांची चढ्या भावाने विक्री करून शेतकऱ्यांची लूट केल्या जात आहे संबंधित प्रकरणी चौकशी करून दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन बहुजन नेते नागनाथ घीसेवाड यांच्यासह शिष्ट मंडळाने तहसीलदार भोकर यांना 11 जून रोजी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी बियाणे खरेदी करण्यास बाजारात येत असून भोकर मधील कृषी सेवा केंद्र दुकानदार बियाणांची अधिक भावाने चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची सर्रास लुट करीत आहेत, तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे कुणी लोकप्रतिनिधी पण या गंभीर या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत, कपाशीच्या मूळ किमती 865 रुपये असताना 2500 रुपये, 1500 रुपये, 3000 रुपये, 1200 रुपये अशा चढ्या भावाने राशी, संकेत, सुपर कोट, बहादुर, अशा कपाशीच्या वानांची कृत्रिम टंचाई करून अधिक दराने विक्री केली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत असून भोकर मध्ये कृषी दुकानदाराकडून चालू असलेल्या या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर नागनाथराव घीसे वाड, नागोराव शेंडगे, पत्रकार एल.ए.हिरे, बी.आर.पांचाळ, शिवसेनेचे सुभाष नाईक, रमेश महागावकर, साईनाथ याटेवाड, विठ्ठलराव देवोड, प्रकाश बोंदीरवाड, निखिल हंकारे, साहेबराव भोंबे, पत्रकार अहमद भाई करखेलीकर अनिल डोईफोडे, दत्ता बोईंनवाड, सुरेश चौधरी, शिवाजी हुबेवाड, गितेश बोटलेवाड अक्कलवाड योगेश आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन देऊन संबंधित दुकानदारांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणा देऊन काळाबाजार थांबवण्याची मागणी केली