भोकरचा सर्वांगीण विकास साधण्याचे माझे स्वप्न- खा. अशोकराव चव्हाण
भोकरचा सर्वांगीण विकास साधण्याचे माझे स्वप्न- खा. अशोकराव चव्हाण
*********
भोकर(तालुका प्रतिनिधी) शहरात यापूर्वी अनेक विकासाची कामे झाली आहेत,मोठ्या प्रमाणावर विकास निधी देऊन शहराची सुंदरता वाढविण्यासाठी प्रयत्न केले,यापुढेही शहरात मोठ्या विकासाची कामे करून सुंदर शहर बनवून सर्वांगीण विकास साधण्याचे माझे स्वप्न आहे अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथील विविध वार्ड सभा मधून बोलताना दिली.
भोकर शहरातील विविध वार्डामधील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खा.अशोकराव चव्हाण यांनी दि.6 सप्टेंबर रोजी संवाद बैठका घेतल्या शहरातील गंदेवार कॉलनी येथे घेतलेल्या बैठकीच्या प्रारंभी संकटनाशन हनुमान मंदिर येथे पूजा करण्यात आली त्यानंतर वार्डातील नागरिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले प्रास्ताविकात पत्रकार बी.आर.पांचाळ यांनी खा.अशोकराव चव्हाण यांच्या विकासात्मक दूरदृष्टीमुळे तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली,शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला,रस्ते झाले आहेत,शासकीय इमारती झाल्या, विकास कामांना कुठेच कमी नाही असे सांगून गंदेवार कॉलनी येथील संकटनाशन हनुमान मंदिराच्या समोर सभा मंडप बांधून द्यावा,रेल्वे पटरी च्या बाजूचा रस्ता करून देण्यात यावा, जुनी पडीक विहीर बुजवून द्यावी,दोन ठिकाणी नाल्यांचे बांधकाम करून देण्यात यावे अशी मागणी केली, डॉक्टर यु.एल.जाधव आनंद जाधव ,डॉ.बालाजी अंदबोरीकर यांनीही विचार मांडले या कार्यक्रमास अमरनाथ राजूरकर,प्रकाश देशमुख भोसीकर,बाबुराव मामा अंदबोरीकर,विनोद पा.चिंचाळकर साहेबराव सोमवाड,किशोर पाटील,गणेश पा.कापसे,हरिभाऊ चटलवार,माधव शिंदे,डॉ.राम नाईक, सु वेश पोकलवार,बी.आर .वाकोडे विजय पोकलवार,संतोष मारकवार,गंगाधर वारले,संगेवार,भोसले,जाधव यांच्यासह नागरिक युवक महिला उपस्थित होत्या. श्री बालाजी मंदिर,गांधी चौक,सराफा गल्ली,या ठिकाणीही बैठका घेण्यात आल्या