आपला महाराष्ट्रक्राईम वार्ता
भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी
भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी
वसमत….. प्रतिनिधी…..
वसमत येथील लोककेसरी वर्तमानपत्राचे संपादक तथा पत्रकार चंद्रकांत चिटकलवार यांच आज पळसगाव येथे झालेल्या भीषण अपघातात दुखःद निधन झाले तर त्यांच्या सोबत असलेले मोनु दरक गंभीर जखमी झाले आहेत.
आज कामानिमित्त दोघेजण नांदेड येथे गेले होते परत येत असताना पळसगाव येथे त्यांच्या मोटरसायकलचा व एका कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये वसमत येथील लोककेसरी वर्तमानपत्राचे संपादक व पत्रकार श्री चंद्रकांत चिटकलवार यांचे निधन झाले तर येथील मोंढ्यातील व्यावसायिक मोनु दरक हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमीला अधिक उपचारासाठी नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. या दुःखद घटनेने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाल्याची चर्चा आहे.