भाजपासाठी नांदेड जिल्हा महाराष्ट्रातुन सर्वोत्कृष्ट काम करणारा जिल्हा राहील- खा.अशोकराव चव्हाण
भाजपासाठी नांदेड जिल्हा महाराष्ट्रातुन सर्वोत्कृष्ट काम करणारा जिल्हा राहील- खा.अशोकराव चव्हाण
*************
भोकर(तालुका प्रतिनिधी) विरोधकांनी खोटं नाटं बोलून सर्व सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला,संविधान बदलण्याबाबत,अनु.जाती,जमातीचे आरक्षण जाण्याबाबत अपप्रचार करण्यात आला आता जनतेने मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता विचारपूर्वक निर्णय घ्यावा,माझ्यावर विश्वास ठेवा मी सदैव तुमच्या सोबत आहे आता येणाऱ्या निवडणुकीत भाजपासाठी नांदेड जिल्हा महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट काम करणारा जिल्हा राहील असा विश्वास माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खा.अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथे नांदेड जिल्हा भाजपा( उत्तर)अधिवेशनात बोलताना केले.
भोकर येथील ओम लॉन्स येथे4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजतानांदेडजिल्हा(उत्तर)भोकर,हदगाव- हिमायतनगर,किनवट- माहूर या विधानसभा मतदार संघाचे जिल्हा अधिवेशन घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण हे होते तर उद्घाटक खा.डॉक्टर अजित गोपछडे होते प्रारंभी भारतमाता पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आल्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष एड.किशोर देशमुख यांनी करून पक्षाची भूमिका मांडली, केंद्रामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला,राजकीय ठराव मांडण्यात आला अधिवेशनाला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले हे अधिवेशन महत्त्वपूर्ण असून तळागाळातील सर्वसामान्य माणसांना भेटता येते संवाद साधता येतो आणि येणाऱ्या विधानसभेची तालीमच नाही तर जिल्हा परिषद,नगर परिषद,पंचायत समितीची सुद्धा ही तालीम आहे पुढची पक्षाची वाटचाल ताकदीने लढण्यासाठी आहे,जोमाने काम करावे लागेल अडथळे निर्माण करण्यात येत आहे,वातावरण दूषित करण्यात येत आहे,आता आपणास आत्मविश्वासाने लढले पाहिजे,सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकास्ता करून जिंकणार ही भूमिका घेऊन काम करावे लागेल, नवा जुना असा कुठलाच भेदभाव मी करीत नाही,जो काम करेल तो पुढे जाईल,निपक्षपणे काम करेल अशा व्यक्तीला हत्तीचं बळ येतं, भाजपामध्ये येण्यापूर्वी मी सुद्धा आत्मविश्वासाने लढलो जिल्ह्यात सर्व जागा जिंकून आणल्या असे सांगून भाजपा संविधान बदलणार आहे असा खोटा अपप्रचार होतो आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी निकाल दिला आहे की देशाचे संविधान बदलता येत नाही देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाजातून आहेत त्या हे कसे होऊ देतील?
जिल्ह्यात नेतृत्व मजबूत करा मुंबई दिल्लीत कामे होतील
****************
खोटं बोलून पळ काढता येत नाही जिल्ह्यात विकासाचं नेतृत्व मजबूत करा मुंबई दिल्ली मध्ये आपली कामे तात्काळ होतील मराठवाड्याचा अनुशेष भरून काढायचा आहे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने सोशल मीडियावर सार काही खोट्या पद्धतीने रंगविल्या जात आहे हे सारे लोक करमणूक म्हणून बघतात असा टोला भावी आमदार म्हणून घेणाऱ्यांना खा.चव्हाण यांनी मारला
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करतील
***************
भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होणारे नरेंद्रजी मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत यावेळी सुद्धा भाजपाच्या जागा अधिक आल्या मोदीजींना ताकद देण्याचं आपलं सर्वांचं काम आहे 5 वर्षाचा कार्यकाळ नरेंद्रजी मोदी हे यशस्वीपणे पूर्ण करतील असा विश्वास खा.अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला, सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावात आपल्या बुथवर जाऊन काम करा पक्षाची भूमिका समजून घ्या हेवेदावे सोडून एकोफ्याने काम करा भोकर मध्ये रोजगार मेळावे लावून बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यात येतील असे सांगून भोकर तालुक्यातील पिंपळढव प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन टेंडर निघणार आहे,सुधा प्रकल्पाचे काम देखील पूर्णत्वास आले आहे,काळ डोह प्रकल्पही काम पूर्ण होणार आहे असेही खा.चव्हाण यांनी सांगितले
आरक्षण म्हणजे नोकरी नाही
महायुती सरकारने मराठा समाजाला10 टक्के आरक्षण दिले आहे मी सुद्धा त्यासाठी पुढाकार घेतला इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आले त्या आरक्षणांमधून नोकऱ्या सुद्धा मिळाल्या आरक्षण म्हणजे नोकरी नाही शिक्षण शिकून गुणवत्ता प्राप्त करावी लागते पंतप्रधान मोदीजींनी ई डब्ल्यू एस मधून दहा टक्के आरक्षण दिले मी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना भेटून आरक्षणाविषयी भूमिका मांडली माझा पाठपुरावा चालू आहे,विधानसभेत विषय मांडला असता एकही विरोधी पक्षाचा आमदार तिथे आला नाही असेही खा.चव्हाण म्हणाले
खा. चव्हाणांमुळे खडकाळ भागावर हिरवळ फुलली -खा.डॉ.गोपछडे
****************
भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये असताना अशोकराव चव्हाण यांनी दुसऱ्या कुणाचा पाय शिरू दिला नाही मी अनेक वेळा येथे येऊन प्रयत्न केला मात्र मला काही जमले नाही खडकाळ भागावर त्यांनी हिरवळ फुलवली आता आम्ही दोघेही एकत्र आलो आहोत जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा प्रकल्प आणायचा आहे देशाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व लाभलेले आहे पहिले देश नंतर पक्ष असे ब्रीद असून भाजपा विचाराचा संस्काराचा पक्ष आहे आता सर्वांनी मिळून काम करायच आहे विकास साधायचा आहे असे खा.डॉ.गोपछडे यांनी विचार मांडले
खा.चिखलीकरांची जिल्हा अधिवेशनाला अनुपस्थिती
****************
भोकर येथे आयोजित 4 ऑगस्ट रोजीच्या भाजप जिल्हा अधिवेशनास माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांची अनुपस्थिती होती भोकर मधील भाजपाचे काही जुने प्रमुख कार्यकर्ते देखील या अधिवेशनास अनुपस्थित होते याबाबत मात्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनवला होता
या अधिवेशनात आ भीमराव केराम ,माजी आमदार अमरनाथ राजूरकर, यांनीही विचार मांडले,श्याम बापू महाराज,महंत प्रभाकर बाबा कपाटे,सुधाकर भोयर गणपत पीठेवाड,प्रवीण गायकवाड.मंगाराणी आंबुलगेकर,तालुका अध्यक्ष गणेश पा.कापसे,सभापती जगदीश पा.भोसीकर,भगवानराव दंडवे यांच्यासह सर्व तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन कल्याणकर यांनी केले तर आभार रामचंद्र मुसळे यांनी मानले