भव्य दसरा प्रदर्शनीचे आज उद्घाटन
भव्य दसरा प्रदर्शनीचे आज उद्घाटन
वसमत… प्रतिनिधी….
वसमत तालुक्यातील वैभव असलेला श्री सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सवाचे आज दि.04 ऑक्टोबर रोज शुक्रवार सायं. 6-00 वा मान्यवरांचा हस्ते उद्घाटन होणार आहे. दरवर्षी नवरात्री निमित्त दसरा समितीतर्फे येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर ही भव्य प्रदर्शनी भरवण्यात येते. यानिमित्ताने वसमत शहरातील व आजुबाजुच्या ग्रामीण भागातील आबालवृद्ध येथे विविध स्पर्धा, खेळ, मनोरंजन, आतषबाजी, गृहोपयोगी वस्तू खरेदी इत्यादी गोष्टींचा आनंद घेतात. दसर्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होत असते. मागील चार दशकापेक्षा अधिक काळाची परंपरा असलेल्या या कार्यक्रमाची नागरिक वाट पहात असतात.
या निमित्त आज दि.4 ऑक्टोबर पासुन सुरु होणार्या या दसरा महोत्सवात प्रदर्शनी, विविध खेळ, भव्य कृषी प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, कोजागिरी, दांडिया आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी वसमत तालुक्याती आजी माजी आमदार, सर्व जि.प.आजी माजी पदाधिकारी, पंचायत समिती आजी, माजी पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व आजी-माजी सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, नगर परिषदेचे आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेविका, नगरसेवक, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, सर्व पत्रकार बांधव, सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलीस बांधव यानी सदरील कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव समिती, वसमत च्या वतीने करण्यात आले आहे.