Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्ताराजकारणसामाजिक कार्य
बांगलादेशातील हिंदु बांधवांवरील अत्याचाराच्या विरोधात वसमत बंदचे आवाहन
बांगलादेशातील हिंदु बांधवांवरील अत्याचाराच्या विरोधात वसमत बंदचे आवाहन
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
वसमत/प्रतिनिधी.
बांगलादेश येथील हिंदुवर होणारे अत्याचार थांबावे तसेच बांगलादेश येथील हिंदूंची यातुन सुटका व्हावी यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने वसमत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हिंदु धर्मावर वाढते धर्मांतरण यासाठी जागतिक स्तरावर हिंदुस्थान सरकारकडून लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी हिंगोली-नांदेड-परभणी जिल्हा पुर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.
यात वसमत तालुक्यात सुध्दा दि.17/08/2024 रोजी संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत येथे मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.
तरी वसमत तालुक्यातील ग्रामीण शहरातील सर्व हिंदु बांधव, भगिनी, महिलांनी या मोर्चात सहभागी व्हावे व बाजारपेठ दिवसभर बंद ठेवावी असे आवाहन सकल हिंदु समाज वसमतचा वतीने करण्यात आले आहे.