बदलापूर प्रकरणी मानवतला महाविकास आघाडीची निदर्शने
बदलापूर प्रकरणी मानवतला महाविकास आघाडीची निदर्शने
मानवत प्रतिनिधी : बदलापूर येथे २ चिमुरड्यावर झालेल्या अत्याचार व राज्य सरकारच्या निषेधार्थ शुक्रवारी ता २३ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने काळ्या फिती बांधून तीव्र निदर्शने करण्यात आली .
शहरातील महाराणा प्रताप चौकात झालेल्या या निदर्शनात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सामील झाले होते . यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .
या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा चे जिल्हा कमिटी सदस्य रामराजे महाडीक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जिल्हा उपाध्यक्ष ॲड. लुकमान बागवान, तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस बाबाजी आवचार, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट संतोष लाडाने, जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव काळे, संभाजी ब्रिगेड चे गोविंद घांडगे, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अनिल जाधव, युवा सेनेचे ता. प्रमुख कृष्णा शिंदे, शहर संघटक सुरेश बनगर, ॲड. विक्रमसिंह दहे, अनंतमामा भदर्गे, शैलेश वडमारे, माऊली काका कदम, नंदू पाटील, सरपंच बबलू राजे, दत्ता पांढरे, सुरेश चव्हाण, अफसर भाई अंन्सारी, आरेफभाई, हरदयालसिंग, जाबेरलाला, वैजेनाथ महीपाल, संतोष आंबेगावकर, बाबा काळे, गणेश दहे, कैलास दळवे, कूंडलिक थिटे, भागवत गायकवाड आदीजण सामील झाले होते .