फार्मासिस्टने स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची गरज – मनोज पैठणे
फार्मासिस्टने स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची गरज – मनोज पैठणे
मानवत / प्रतिनिधी
सध्याच्या स्पर्धेच्या युगात फार्मासिटने आपले स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची गरज असून यासाठी प्रत्येक फार्मासिस्टला स्मार्ट फार्मासिस्ट होणे गरजेचे आहे. त्याकरिता कसोशीने प्रयत्न करावेत असे प्रतिपादन परभणी जिल्ह्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मनोज पैठणे यांनी जागतिक फार्मसीसिस्ट दिनाच्या निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी केले. मानवत येथील नगरपालिका सभागृहात २६ सप्टेंबर रोजी केमिस्ट अँड ड्रुगिस्ट संघटनेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ केमिस्ट फार्मासिस्ट यांचा सेवापूर्ती गौरव पुरस्कार सोहळा व फार्मासिस्ट मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांत परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री , सचिव सूर्यकांत हाके , मराठवाडा संघटनेचे सहसचिव अनिल हराळ , जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष दत्ताराव गाडगे, सहसचिव नारायण मुंदडा व जिल्हा कार्यकारणी सदस्य दिगंबर बाकळे यांच्यासह औषध निरीक्षक मनोज पैठणे यांनी धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी मनोज पैठणे यांनी उपस्थित सर्व फार्मासिस्ट यांना स्वतः कार्याबद्दल मार्गदर्शन करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जिल्हा संघटनेचे सचिव सूर्यकांत हाके यांनी फार्मासिटने स्मार्ट फार्मासिस्ट बनण्यासाठी संघटनेने दिलेल्या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा असे सांगितले. तर अध्यक्षीय समारोप मध्ये जिल्हा संघटनेचे अध्यक्ष या संजय मंत्री यांनी संघटनाही केमिस्ट आणि फार्मासिस्ट यांच्यासाठी नेहमीच काम करत असून फार्मासिष्ठ व केमिस्ट्रियांच्या साठी तत्पर असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम तालुकाध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ केमिस्ट फार्मासिस्ट म्हणून ढमढेरे मेडिकल चे मालक अनिल ढमढेरे यांचा ३७ वर्षाच्या सेवेबद्दल सेवापुर्ती जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रशांत लकडे , गजानन मसलकर, वैभव कीर्तनकार, संदीप देशमाने ज्ञानेश्वर हेडगे , सार्थक साखरे, संजय बाहेती ,लक्ष्मण जवादे ,अशोक होगे ,अनंत यादव, शशिराज फटाले , गोविंद ढमढेरे व दीपक दुकाने आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्विक संजय नाईक यांनी तर सूत्रसंचालन सूर्यकांत माळवदे यांनी केले.