आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रआरोग्य विभागसरकारी योजना

प्लंबरची बिले थकली;शहरात रोगराई वाढली – भाजपचे निवेदन

प्लंबरची बिले थकली;शहरात रोगराई वाढली –भाजपचे निवेदन

मानवत / प्रतिनिधी

मानवत नगरपालिकेत अधिकृत प्लंबर चे बिले थकले असल्याकारणाने प्लंबर काम करीत नसल्याने शहरातील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन दुरुस्तीचे कामे रखडले आहे परिणामी शहरात रोगराईचे प्रमाण वाढले असून याबद्दल भाजप चे पदाधिकारी यांनी निवेदन देऊ प्लंबर चे थकीत बिले काढून शहरातील रोगराई दूर करण्याचे निवेदनाद्वारे कळवले आहे.

भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हा सहसंयोजक अनंत गोलाईत यांनी शहरातील रोगराई च्या अनुषंगाने नगरपालिकेला निवेदन दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि मानवत नगर परिषदेचे सर्व अधिकृत प्लंबरांचे मागील दहा महिन्यांपासून बिले थकलेली आहेत. नगर परिषदेकडे शहरातील अनेक नेते मंडळींनी संबंधित लोकांच्या बिलासाठी पाठपुरावा केला.परंतु नगर परिषदेकडुन उडवा उडवीची उत्तरे मिळत गेली.शहरातील सर्व प्लंबरांचे काम बंद असल्याने शहरातील पाईप लाईन नादुरूस्ती, लीकेजेस वाढल्याने पाईप लाईनमध्ये अनेक ठिकाणी अक्षरशः नालीचे पाणी जात आहे. तसेच शहरा मध्ये वॉल लीकेजच्या कारणानेअनेक भागात रोज पाणी पुरवठा होत आहे तर काही भागांत आठ दिवसांना पाणी पुरवठा होत आहे. या सर्व बाबींना नगर पालिका प्रशासन जबाबदार असुन शहरामध्ये साथीचे आजार, डेंग्यु आणि ईतर आजार पसरत आहेत. तसेच शहरातील रोगराई वाढण्यास कारणीभुत आहे. तरी प्लंबरांचे थकलेली बिले अदा करून तत्काळ कामावर रूजु करण्यात यावे आणि शहरात वाढलेले पाईप लाईन नारुदुस्ती व लीकेजेस दुरूस्त करण्यात यावे.असे या निवेदनात म्हटले आहे.

शहरात एक डेंगू सदृश्य रुग्ण
मानवत येथील एक वैद्यकीय व्यावसाय करणाऱ्या डॉक्टर यांना डेंगू सदृश्य ताप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या डॉक्टरच्या दवाखाना व परिसरात ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाने भेट दिली असून त्याचे रक्ताचे नमुने जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत .
प्रतिक्रिया
पाईप लाईन मध्ये असलेले लिकेजस काढण्याचा सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहेत तर डेंगू सदृश्य रुग्ण शहरात आढळल्याचे माहिती प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने फॉगिंग मशीन चालू करून सर्व प्रभागात धूर फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत परंतु ढगाळ वातावरणाने धुर फवारणी करण्यास अडचण येत आहे हवामान कोरडे झाले की तात्काळ धुर फवारणी सुरू होईल. – कोमल सावरे प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरं पालिका मानवत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button