सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसामाजिक कार्य

प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करा

प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करा
**********

भोकर मध्ये ओबीसी समन्वय समितीच्या वतीने निवेदन
***********

भोकर (तालुका प्रतिनिधी) ओबीसी भटक्या विमुक्त जाती या वंचित समूहाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भोकर तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने निषेध करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन 1 ऑक्टोबर रोजी तहसीलदार भोकर यांना देण्यात आले.
30 सप्टेंबर रोजी पुणे येथे काही समाजकंटकाकडून प्रा. लक्ष्मण हाके यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल चुकीचे पोस्ट टाकून बदनामी करण्यात आली असे कृत्य करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करून तात्काळ कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला
निवेदनावर ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड, नागोरावजी शेंडगे, बी. आर. पांचाळ, एड. शेखर कुंटे माधव अमृतवाड, नंदकुमार कोसबतवार सतीश देशमुख दिनेश लोणे सुरेश गुज वाड संजय देवकते, किशन सोळंके रामा भालेराव संजय शेंडगे संदीप कानकाटे संजय शेंडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button