पोलीस वसाहत मैदानावर बच्चे कंपनी साठी ” जीम “
पोलीस वसाहत मैदानावर बच्चे कंपनी साठी ” जीम “
उस्माननगर ( गणेश लोखंडे) उस्माननगर येथील लहान मुलांची व्यायामाची सोय व्हावी म्हणून पोलीस वसाहत मैदान परिसरात विविध प्रकारच्या साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्याच्या काळात तरुण व लहान मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी अती मोबाईल वापरामुळे वेळ मिळत नाही. बौद्धीक दृष्टीने विकसित पण शारीरिक पातळीवर मुलांची सुदृढ वाढ होत नसल्याचे चित्र मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे. सतत मोबाईल वर गेम रील्स, गाणी पाहण्यासाठी धडपडणारे ,चिडचिड करणारे मुलांची संख्या वाढत आहे. म्हणावे तसा लहान मुलांची शारीरिकव मानसिक वाढ होत नाही. एकलकोंडा स्वभाव वाढून मुलांची स्वमग्नता वाढत आहे.हे लक्षात घेऊन ग्राम पंचायत ने मिनी जीम उभारुन व्यायामाची व्यवस्था केली आहे.
विशेष म्हणजे पोलीस वसाहत मैदानावर असलेल्या या महत्त्वाच्या उपक्रमामुळे व्यायाम करताना मुले व तरुण शिस्त पाळत आहेत हे दिलासादायक चित्र दिसून येते आहे.
तरुणांना पोलीस, सैन्य भरती साठी उपयुक्त सराव करण्यासाठी यामुळे सोय झाली आहे. मोकळ्या प्रसन्न अशा नैसर्गिक वातावरणात असलेल्या या मिनी व्यायामशाळे मुळे लहान मुलांना व्यायामाची सवय लागावी.त्यांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी जीम व्यवस्था करुन दिल्याबद्दल गावकऱ्यांनी सरपंच व ग्रामसेवकांचे कौतुक केले आहे.