पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू: बाजारात बियाणे खरेदीसाठी गर्दी
पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू: बाजारात बियाणे खरेदीसाठी गर्दी
——– ———–
भोकर (तालुका प्रतिनिधी)
पूर्व मौसमी पाऊस सुरू झाल्याने आणि मृग नक्षत्र नक्षत्र निघाल्याने खरिपाच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी सुरू झाली आहे.
चालू वर्षी प्रचंड उन्हाळ्याची तीव्रता जाणवली ऊणाच्या तीव्रतेने जनजीवन विस्कळीत झाले होते पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवली उ काड्याने सर्व नागरिक हैरान झाले होते एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस सुरू झाला मे महिन्यात देखील पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता काही दिवस उकाड्यापासून दिलासा मिळाला होता मात्र त्यानंतर पुन्हा कडक उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली जून महिन्यात ढगाळ वातावरण सुरू झाले पूर्व मोसमी पावसाने सुरुवात केली.
शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू: बाजारात गर्दी
******************
6जून रोजी पूर्व मोसमी पावसाने सुरुवात केली ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट काही भागात पाऊस देखील पडला 7 जून रोजी मृग नक्षत्र निघाले त्यामुळे पेरणी ची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केली बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली असून शेती मशागतीची कामे पूर्ण करून ठेवण्यात आलेली आहेत दमदार पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे चालू वर्षी रासायनिक खताचे भाव वाढलेले असून बियाणे व खते खरेदी करताना शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे मागील वर्षाच्या खरीप हंगामाने साथ दिली नसल्याने चालू वर्षी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झालेली दिसत आहे