पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष मा.श्री. रविभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष मा.श्री. रविभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त; गरीब विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पिंपरी चिंचवड दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी पुनावळे येथे, पिंपरी चिंचवड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री रविंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पुनावळे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्वेसर्वा माननीय श्री सुरज भाऊ पांढरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
या सोहळ्याच्या निमित्ताने, काटे वस्ती येथील फरांदे स्कूल मध्ये, जे फरांदे बिल्डर्सच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी चालवले जाते, तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये शालेय बॅग, चित्रकलेची वही, अंकलीपी, पेन्सिल आणि इतर आवश्यक शालेय साहित्यांचा समावेश होता. या उपक्रमाचा उद्देश शिक्षणाच्या प्रवाहात सर्व मुलांना समाविष्ट करणे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे हा होता.
तसेच, माऊली क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉक्टर किरण जोशी यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आणि आवश्यकतेनुसार औषधांचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी रविंद्र पवार यांनी मुलांसाठी केक कापून त्यांना अल्पोपहार दिला. हा सोहळा मुलांसाठी एक आनंदाचा क्षण ठरला.
या कार्यक्रमामध्ये जोशी परिवारातील कु. रिद्धी किरण जोशी, सिद्धी किरण जोशी, चि. कर्मण्य मिलिंद जोशी यांनी
“मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये अभूतपूर्व यश मिळवल्याबद्दल ट्रॉफी देवुन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच ऑल इंडिया इंडिपेंडेंस कप कराटे चॅम्पियनशिप न्यू दिल्ली 2024 मध्ये कु शिवांश किरण काटे याला रौप्य पदक मिळवल्याबद्दल त्यालाही ट्रॉफी देवुन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे खजिनदार माननीय नंदू शेठ पानसरे यांच्यासह थेरगाव, वाकड, हिंजवडी, ताथवडे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय तुषार टाव्हरे, सचिव गणेश शेठ जाधव, संघटित सचिव माननीय संतोष शेठ बोडके, खजिनदार सूर्यभानजी ढवळे, क्रीडा व सांस्कृतिक प्रमुख सचिनजी मुळूक, दिनेश सोलंकी (झोनल लिडर), प्रवीण गांगुर्डे (झोनल लिडर), मिलिंद जोशी, गणेश चौधरी, योगेश पाटील, अमित जाधव, दोलत राठोड, जगदीश कुमार, अभिजित राठोड, ज्योती पवार (झोनल लिडर), नेहा जोशी (झोनल लिडर), स्वेता पंढरपूरकर (झोनल लिडर), आणि रोहिणी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुनावळे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सुरज भाऊ पांढरे यांच्या नेतृत्वाखालील टीमने अत्यंत उत्कृष्ट रीतीने पार पाडले. अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्य भविष्यातही सातत्याने सुरू राहावे, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.