परभणी व मानवत तालुक्यातील 42 गावांचा पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा आ.सदाभाऊ खोत यांच्याकडे मागणी
परभणी व मानवत तालुक्यातील 42 गावांचा पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा आ.सदाभाऊ खोत यांच्याकडे मधुकर अवचार यांची मागणी
मानवत प्रतिनिधी
विधानपरिषद सदस्य तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.सदाभाऊ खोत यांची पुणे येथे राज्यकार्यकारणी व विधानपरिषद सदस्य दुसऱ्यादा निवडझाल्याबदल सत्कार सोहळ्यास उपस्थितीत भेट घेऊन रयत क्रांति संघटनेच्या वतीने संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष मधुकर अवचार,उपजिल्हाध्यक्ष परमेश्वर घाटुळ,सेलु तालुका अध्यक्ष दत्तराव शेळके,भरत झिंबरे,चक्रधर घाटुळ,श्रीधर आगरकर, महादेव हारकळ. ज्ञानेश्वर गीरी यांनी त्यांचा सत्कार केला.तसेच परभणी व मानवत तालुक्यातील 42 गावांचा पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निवेदन देऊन केली. परभणी जिल्ह्यातील मानवत व परभणी तालुक्यात जायकवाडीचा डावा कालवा तर सेलू तालुक्यात निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा आहे. या दोन्ही कालव्याच्या आतील किमान ७० गावांना शेतीसाठी पाणी पोहचलं नाही. या गावांना दोन्ही प्रकल्पापासून लाभ मिळत नसल्याने 42 गावांतील पाणी संघर्ष समिती व शेतकरी यांनी आंदोलनाचा पावित्रा घेताच राज्यशासन व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी (दि.८) ऑगस्ट 2024 रोजी 42 गाव संघर्ष समितीशी चर्चा करुण या गावात पाणी उपलब्धते बाबत प्राथमिक सर्वेक्षण करुण त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आणि त्यानुसार परिपत्रक काढले.42 गावे जायकवाड़ी व लोअर दुधना प्रकल्पातुन होणाऱ्या सिंचनापासून वंचित आहेत. मुळात जमीनी मध्यम व हलक्या स्वरूपाच्या आहेत.त्याच अनेक वेळा अवेळी पडणारा पाऊस यामुळे या 42 गावातील शेतकरी,शेतमजूर संकटात सापडला आहे.त्यामुळे
शेतकऱ्यांचे कैवारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असून मानवत आणि परभणी तालुक्यातील 42 गावातील पाण्यापासुन वंचित असणाऱ्या शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोटतिडकिने शेतकऱ्यांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करुण सोडवावा ही विनंती करतो.तसेच परभणी,मानवत तालुक्यातील ४२ गावातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सोबत पाणी संघर्ष समितीची एक बैठक लावावी अशी मागणी
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
आ.सदाभाऊ खोत यांच्याकडे रयत क्रांती संघटनेच्या वतीने रयत क्रांति संघटना जिल्हाध्यक्ष मधुकर अवचार,उपजिल्हाध्यक्ष परमेश्वर घाटुळ,सेलु तालुका अध्यक्ष दत्तराव शेळके,भरत झिंबरे,चक्रधर घाटुळ,श्रीधर आगरकर, महादेव हारकळ. ज्ञानेश्वर गीरी अदिनी निवेदनाद्वारे केली आहे.