पत्रकार बी.आर.पांचाळ यांना महात्मा कबीर समता परिषदेचा “महाराष्ट्र भूषण” व जीवनगौरव पुरस्कार
पत्रकार बी.आर.पांचाळ यांना महात्मा कबीर समता परिषदेचा “महाराष्ट्र भूषण” व जीवनगौरव पुरस्कार
**************
भोकर( तालुका प्रतिनिधी) पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करून सर्व सामान्याना न्याय देत सामाजिक कार्यात सहभाग घेणारे भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांना महात्मा कबीर समता परिषदेचा महाराष्ट्र भूषण व जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
पत्रकार बी.आर.पांचाळ यांनी मागील 34 वर्षापासून पत्रकारितेमध्ये वेगळा ठसा उमटवला असून ग्रामीण भागातील समस्या, ग्रामस्वच्छता, जलसंधारण, वृक्षारोपण अशा विविध विषयावर लिखाण करून सामाजिक प्रश्न मांडले आहेत, धार्मिक व सामाजिक कार्यामध्येही त्यांचा मोठा सहभाग असतो यापूर्वी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार,शासनाचे पुरस्कार,विभाग व जील्हास्तरीय पुरस्कार मिळाले,विविध संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महात्मा कबीर समता परिषद यांच्या वतीने वर्ष 2023 -2024 चा महाराष्ट्र भूषण व जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मुकुंदराज पाटील यांनी पुरस्कार घोषित करण्यात आल्याचे पत्र पाठवले असून 14 ऑगस्ट रोजी नांदेड येथे पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे