पत्रकारांनी आव्हानाला तोंड देण्यासाठी पर्याय तयार करावेत- उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी
पत्रकारांनी आव्हानाला तोंड देण्यासाठी पर्याय तयार करावेत- उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी) स्वातंत्र्य पूर्वीच्या काळामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली पत्रकारिता सामाजिक हिताची होती आजच्या पत्रकारितेसमोर जरी आव्हाने उभी असली तरी त्याला सामोरे जात निर्भीडपणे सत्य लिखाण करावे आणि पर्याय तयार करावेत असे विचार भोकर येथे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी दर्पण दिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
6 जानेवारी रोजी भोकर येथील शासकीय विश्रामगृहावर दर्पण दिन साजरा करण्यात आला प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी म्हणाले आज पत्रकारासमोर अनेक अडचणी आहेत मात्र नकारात्मक सोडून सकारात्मक लिखाण करावे चांगल्या बातम्या मधून नक्कीच परिणाम दिसून येतात, वृत्तपत्रांची सत्यता आजही टिकून आहे वृत्तपत्रांची धमक वेगळी आहे आज अनेक माध्यमे आली असली तरी वृत्तपत्रांची विश्वासार्हता वेगळी आहे ती कधी संपणार नाही, पोलीस निरीक्षक अजित कुंभार यावेळी बोलताना म्हणाले पत्रकार जीवन धोक्यात घालून काम करीत असतात सामाजिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी अविरतपणे काम करतात भोकर मधील पत्रकार चांगल्या बातम्या छापून सामाजिक वातावरण जपण्याचे काम करतात,पत्रकार संरक्षण कायद्यासाठी आम्ही तत्पर आहोत असेही ते म्हणाले राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पत्रकार बी.आर. पांचाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आचार्य अत्रे, लोकमान्य टिळक, महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनंत भालेराव यांच्या विचारांची पत्रकारिता करावी असे विचार बी.आर.पांचाळ यांनी मांडले प्रस्ताविक एल. ए.हिरे यांनी केले, बाबुराव पाटील, उत्तम बाबळे, राजेश वाघमारे, सुभाष तेले, अहमद करखेलीकर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार बी.एस. सरोदे, श्रीकांत देव,अनिल डोईफोडे, मनोजसिंह चौहान, सुभाष नाईक,सिद्धार्थ जाधव, शंकर कदम, विजय मोरे, रमेश गंगासागरे, शिवाजी गायकवाड, गंगाधर पडवळे, शेख लतीफ, एजाज कुरेशी, उत्तम कसबे, हमीद खान पठाण, ज्योती सरपाते आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन मनोज गीमेकर यांनी केले तर आभार जयभीम पाटील यांनी मानले