पत्रकारांनी आपल्या लेखनातून सत्यकथन करावे…. प्राचार्य डॉ मा मा जाधव
पत्रकारांनी आपल्या लेखनातून सत्यकथन करावे…. प्राचार्य डॉ मा मा जाधव
वसमत प्रतिनिधी: पत्रकारांनी निडरपणे आपल्या लेखनातून सत्यकथन करावे असे आवाहन प्राचार्य डॉ मा मा जाधव यांनी केले. येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात दर्पण दिन व पत्रकार दिनानिमित्त आज दिनांक ६ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार बंधु आणि भगिनींचा शाल, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सद्य परिस्थितीत पत्रकारांची शासकीय स्तरावर दखल घेतली जात नाही, सुरक्षा, संरक्षण, सुविधा तसेच सर्व पत्रकारांसाठी शासकीय योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी भावना पत्रकार श्री संजय बर्दापुरे, अनिता चव्हाण यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ बाबुराव खंदारे यांनी हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारांसाठी सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुरु करावा त्यासाठी आपण स्वतः रुपये ५०००/- चा पुरस्कार जाहीर करीत असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर श्री अनिल पंडित यांचा वाढदिवसानिमीत्त याच कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अनिल पंडित यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ शारदा कदम तर आभारप्रदर्शन प्रा डॉ अनिल मुगुटकर यांनी केले.