सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्ता

नेवासा फाटा येथील छत्रपती राजर्षी शाहू को-ऑपरेटिव बँकेत शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी…

नेवासा फाटा येथील छत्रपती राजर्षी शाहू को-ऑपरेटिव बँकेत शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी…

नेवासा प्रतिनिधी-देशात सामाजिक क्रांतीचे नवे पर्व सुरू करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात नेवासा फाटा येथील शाहू बँकेत सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यावेळी शाखा व्यवस्थापक व्ही. एम. चव्हाण मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत.सर्वसामान्यांना आरक्षण कशा पद्धतीने देण्यात यावं याची सर्वात प्रथम संकल्पना ही महाराजांनी मांडली आणि त्यामुळेच आज दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या आठवणी अजरामर आहेत.”
यावेळी पुरुषोत्तम उंदरे, अजिंक्य नवले, ॲड.नितीन अडसुरे, नारायण आठरे, गणेश जाधव, भारतीय जनता पार्टीचे रितेश कराळे, श्रीकांत भगत, नवनाथ काकडे, हरिभाऊ मते, भोसले साहेब या मान्यवरांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button